Sun, Dec 08, 2019 16:33होमपेज › Kolhapur › कळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू

कळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू

Published On: Jul 22 2019 1:31PM | Last Updated: Jul 22 2019 1:31PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कळंबा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. बापूसाहेब लिंबा बोराटे (वय-४९, रा. ताड शोदने, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे या कैद्याचे नाव आहे. आज, सोमवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

अंडरट्रायल कैदी बापूसाहेब बोराटे हा कळंबा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. बोराटे हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होता. काल, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या छातीत कळा सुरू झाल्या. कारागृहातील रुग्णालयात त्याला तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या गुन्ह्यात बापूसाहेब बोराटे याला १८ डिसेंबर २०१७ मध्ये पांगरी पोलिसांनी अटक केली होती. २२ मार्च २०१८ मध्ये बोराटे सह त्याचे भाऊ पुतणे व नातू अशा अकरा जणांना कळंबा कारागृहात हलविण्यात आले होते.

बोराटे याचा मृत्यू होताच घटनास्थळी राजवाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यासह कारागिराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. यानंतर शासकीय रुग्णालयात बोराटे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.