होमपेज › Kolhapur › शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

पवार आज कोल्हापुरात; आघाडीचा संयुक्‍त मेळावा

Published On: Apr 02 2019 9:12AM | Last Updated: Apr 02 2019 9:12AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. 2) कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संयुक्‍त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गुड्स मार्केटजवळील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे.

खा. पवार यांचे पुण्याहून हेलिकॉप्टरने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंगरायाचीवाडी येथील हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते हॉटेल पंचशील येथे येतील. दुपारी खा. धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. संयुक्‍त मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.

रात्री उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनास उपस्थिती लावणार आहेत. रात्री मुक्‍काम करून, बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने सोलापूरकडे पवार रवाना हेातील.