Wed, Apr 08, 2020 07:22होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा 

कोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा 

Last Updated: Mar 26 2020 4:42PM

मास्क व हँड सॅनिटायझरआळते (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यात मास्क व हँड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कोणत्याही मेडिकल्समध्ये मास्क आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध नाही. तर संचारबंदीमुळे गावातून खरेदीसाठी बाहेर जाणे कठीण झाले आहे. यामुळे नागरीकांची तारंबळा उडत आहे.

कोल्हापूरकरांना आता भाजीपाल्याची चिंता नाही, हे वाचाच!

आरेग्य केंद्रामध्ये मोजकेच मास्क मिळत असल्याने रुग्णालयामध्ये वाटायचे कसे व द्यायचे किती असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना पडला आहे. तर प्रथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयामध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक विना मास्क फिरत आहेत.

कोरोना : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक सुविधा

शासकीय आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून शासनाकडून मोजके मास्क दिले जात आहेत. यामुळे कही आरोग्य अधिकाऱ्यांना विना मास्क काम करण्याची वेळ येत आहे. यामुळे तातडीने हे साहित्य तालुक्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिक संख्येने देण्यात यावे अशी मागणी होत आहे.