Mon, Jun 17, 2019 10:50होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्‍या मातीतला 'सोपस्‍कार' (video)

कोल्‍हापूरच्‍या मातीतला 'सोपस्‍कार' (video)

Published On: Oct 12 2018 1:36PM | Last Updated: Oct 12 2018 1:56PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

साई-निर्मल क्रिएशन या बॅनरची निर्मिती असलेला 'सोपस्कार' हा चित्रपट आज १२ ऑक्टोबरला रिलीज झाला. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचे शिक्षण, करिअर व त्यांच्या लग्नाप्रती घेतले जाणारे चुकीचे निर्णय या समाजातील वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आहे.

कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला हा सामाजिक, भावस्पर्शी चित्रपट आहे. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि मूळ संस्कृती जपवून ठेवणाऱ्या या चित्रपटाने कोल्हापूरच्या कलाकारांना या चित्रपटात अभिनय करण्‍याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात झाले असून गडमुडशिंगी गावातदेखील चित्रीकरण करण्‍यात आले आहे..

सोपस्कार चित्रपटाची कथा स्त्री प्रधान असून संपूर्ण कथानकाला कौटुंबिक संस्काराची जोड आहे. लाडकी म्हणजे 'पराया धन' असे मानणाऱ्या पालकांना आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले की फार मोठी जबाबदारी पार पडल्याचे समाधान वाटते. पण, पुढे त्या मुलीचे काय होईल? तिचे स्वातंत्र्य कसे असेल? तिच्या वाट्याला नक्की कसे जगणे येईल? याचा विचार काहीजण करताना दिसत नाही.. 

या चित्रपटातील पवित्रधाराचे तिरंदाजी चे स्वप्न साकार होईल का? लग्नानंतर तिच्या इच्छा पूर्ण होतील का? तिला शिक्षण घेता येईल का? एकंदरीत परिस्थितीप्रमाणे पवित्रधारा काय निर्णय घेणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'सोपस्कार'  हा चित्रपट पाहावा लागेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शक/निर्मात्या/ कथा-पटकथा -संवाद/ गीते ही कविता विक्रममसिंह पाटील यांचे असून आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील दमदार गाणी गायली आहेत.

संगीत-तेजस चव्हाण, नृत्य-संग्राम भालकर, संकलन-बी. महेंतेश्वर, छायांकन- बाबा लाड यांचे असून प्रमुख भूमिका मंजित मानेची आहे. धनंजय पाटील, धनंजय पोलादे, प्रिया पाटील सुमेधा दातार, अमोल चव्हाण, अभिषेक पाटील, प्रफुल्ल पाटील, सोनाली पाटील यांच्या देखील महत्त्‍वाच्‍या भूमिका आहेत.