Mon, May 25, 2020 23:31होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्‍लबतर्फे महाहादगा

कस्तुरी क्‍लबतर्फे महाहादगा

Last Updated: Oct 10 2019 1:39AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
दै. पुढारी कस्तुरी क्‍लब तर्फे नेहमीच अनेक पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असाच एक कार्यक्रम म्हणजे भोंडला (हादगा). या कार्यक्रमासाठी रा. ना. सामाणी विद्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कागलचे सुप्रसिद्ध बंडा भडंग यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.  

घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हादगा खेळला जातो लहान मुली आणि स्त्रिया प्रथम प्रतिकात्मक हत्तीची पूजा करून त्या भोवती फेर धरून हादग्याची 16 गाणी म्हणतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात या पारंपरिक गाण्यांचा काहीसा विसर पडत चालला आहे.

म्हणूनच या परंपरेला उजाळा देण्यासाठी शनिवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता रा. ना. सामाणी विद्यालय क्रीडांगण शिवाजी पेठ कोल्हापूर येथे हा महाहादगा होणार आहे. उपस्थित प्रत्येकीस हादग्याची खिरापत कस्तुरी क्‍लबमार्फत देण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : टोमॅटो एफ. एम. कार्यालय, वसंत प्लाझा, बागल चौक, कोल्हापूर व फोन : 9404684114, 8805007724.