Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी महाहादगा

कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी महाहादगा

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMकोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब तर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात  आहेत. 2018  यावर्षी आतापर्यंत  झालेल्या अनेक कार्यक्रमांचा सभासदांनी मनमुराद  आनंद लुटला. येणार्‍या काळातही असे अनेक दर्जेदार कार्यक्रम सभासदांसाठी आयोजित केले जाणार आहेत. हे वर्ष सभासदांसाठी भरपूर बक्षिसांची लयलूट आणि मनोरंजनाचा खजिना देणारे असणार आहे. 

सोमवार (दि. 15)  सभासदांसाठी महाहादगा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी चार वाजता आर. व्ही. ग्राऊंड, राजहंस प्रिटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे होणार आहे. कस्तुरी क्लबच्या सभासद नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहत. तेव्हा सभासद नोंदणीस इच्छुक असणार्‍या मैत्रिणींनी आजच सभासद व्हा व कस्तुरी क्लबच्या महाहादग्यामध्ये सहभागी व्हा. हादग्यामध्ये सहभागी प्रत्येक कस्तुरी क्लब सभासद मैत्रिणीला केदारलिंग बेकरी यांच्यामार्फत हादग्याची खिरापत दिली जाणार आहे. प्रत्येक सभासदांनी कार्यक्रमास येताना कस्तुरी क्लबचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. कस्तुरी क्लबचे सभासद नोंदणी   शुल्क 600 रु. आहे. कस्तुरी क्लब सभासद नोंदणी केल्यानंतर प्रत्येक सभासदांना 550/- रुपयांचा प्रेशर कुकर, अग्रवाल गोल्डस् अँड सिल्व्हर यांच्याकडून 4 गोल्ड प्लेटेड बांगड्या हे हमखास गिफ्ट मिळणार आहे, तसेच 5,225/- रु.चे फायदे मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी  संपर्क : टोमॅटो एफ.एम., वसंत प्लाझा, बागल चौक, 5 वा मजला, कोल्हापूर. 8805007724,  8805007461, 0231-6625943.