Wed, Oct 16, 2019 10:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पंढरपुरात सन्मान

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पंढरपुरात सन्मान

Published On: Jul 12 2019 1:49AM | Last Updated: Jul 12 2019 1:32AM
पंढरपूर : प्रतिनिधी 

पाणी पुरवठा व स्वच्छता व ग्रामविकास विभाग आयोजित स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ पंढरपूर येथे  झाला. 

या कार्यक्रमास राज्याचे बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, पालकमंत्री विजय देशमुख, कृषी व फलोत्पादन, पणन, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार प्रशांत परिचारक, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर सचिव शाम लाल गोयल, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव अभय महाजन, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण समिती सभापती शीला शिवशरण, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरुण घोलप, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहुल साकोरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत सातारा जिल्हा परिषद द्वितीय, जळगाव तृतीय तर सोलापूर जिल्हा परिषदेस चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.