गडहिंग्लज ः प्रतिनिधी
महिलांच्या कलागुणांना वाव देत दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धा, पारंपरिक उपक्रम राबवून सभासदांचे नेहमीच मनोरंजन केले जाते. मनोरंजनासोबत आरोग्य जपण्यासाठी गडहिंग्लज येथील दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब सदस्यांना मोफत झुंबा आणि एरोबिक्स नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्कशॉपसाठी गडहिंग्लज येथील नटराज प्रेझेंट डी मेकर डान्स अँड फिटनेस अॅकॅडमी यांचे सहकार्य लाभणार आहे. येथे बॉलीवूड, फोक, सालसा, फ्री स्टाईल इत्यादी नृत्य प्रकार शिकवले जातात. अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या नृत्याची आवड जोपासण्यासाठी व आरोग्य सांभाळण्यासाठी यामध्ये सहभागी होतात. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडासा वेळ आपल्या आरोग्यासाठी देऊन फ्रेश व अॅक्टिव्ह कसे राहता येईल हे या प्रशिक्षणाद्वारे महिला व मुलींना शिकता येणार आहे. दि. 15 ते 25 फेबु्रवारी दरम्यान होणार्या या 10 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये झुंबा, एरोबिक्स नृत्य प्रकार व उपप्रकार दाखविले जाणार आहेत. या वर्कशॉपचा शुभारंभ गुरुवार, दि. 15 फेबु्रवारी रोजी दुपारी 2.00 वाजता वर्कशॉपच्या ठिकाणी होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : दै. ‘पुढारी’ विभागीय कार्यालय, मोरे बिल्डिंग, आजरा-संकेश्वर रोड, गडहिंग्लज. संयोजिका ः श्रेया आजरी.
वर्कशॉपचे ठिकाण : नटराज प्रेझेंट डी-मेकर डान्स आणि फिटनेस अॅकॅडमी, शिवगंगा अपार्टमेंट, बँक ऑफ बडोदासमोर, टिळक पथ गडहिंग्लज. वर्कशॉप कार्यकाल : दि. 15 ते 25 फेबु्रवारी वेळ : दु. 2 ते 5.