Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Kolhapur › वडणगेत दीपोत्सव सोहळा उत्साहात

वडणगेत दीपोत्सव सोहळा उत्साहात

Published On: Nov 05 2017 1:53AM | Last Updated: Nov 05 2017 12:10AM

बुकमार्क करा

वडणगे : वार्ताहर

त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून वडणगे येथे ‘दै.पुढारी’ कस्तुरी क्लब आणि बी.एच.दादा प्रेमी युवक मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने येथील पार्वती मंदिराच्या प्रांगणात खास महिलांसाठी दीपोत्सव व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आकर्षक रांगोळी व शेकडो दिव्यांनी पार्वती मंदिर परिसर यावेळी उजळला होता.
या कार्यक्रमात टोमॅटो एफ.एम.फेम बाबुराव व बोलबच्चन यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी विविध स्पॉट गेम घेऊन विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांमधून काढलेल्या लकी ड्रॉमध्ये गौरी पाटील या विजेत्या ठरल्या. यावेळी जितू पाटील यांनी सादर केलेल्या बहारदार गाण्यांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली. स्थानिक बालकलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांना उपस्थित महिलांनी चांगली दाद दिली.

वडणगे येथे कस्तुरी क्लबची सुरुवात करण्यात आली असून, सभासद महिलांसाठी गावातच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कस्तुरीच्या समन्वयकांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमस्थळी बर्‍याच महिलांनी आपले सभासदत्व नोंदवले.  

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील, नूतन सरपंच सचिन चौगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्य सीमा पोतदार, कल्पना शेलार,भारती शेलार, पूजा चौगुले, अनुराधा तिटवे, युवक मंचचे अध्यक्ष महादेव बोणे, 

रवी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र देवणे यांनी केले. अजूनही सभासद 
नोंदणी बी.एच.दादाप्रेमी युवक मंच यांच्याकडे तसेच टोमॅटो एफ.एम.कार्यालयात सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क ः- 8805024242-8805007724.