Sat, Sep 21, 2019 06:42होमपेज › Kolhapur › राजू शेट्टींचा दारुण पराभव; धैर्यशील माने संसदेत 

राजू शेट्टींचा दारुण पराभव; धैर्यशील माने संसदेत 

Published On: May 23 2019 8:22AM | Last Updated: May 23 2019 5:06PM
हातकणंगले: पुढारी ऑनलाईन

राज्यातील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद झाली असून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने जवळपास लाखाच्या घरात विजयी आघाडी घेत राजू शेट्टींना शिवारात पाठवले आहे. सांगलीतून स्वाभिमानीला पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना भविष्यात राजकारण नव्याने विचार करावा लागणार आहे. हातकणंगलेमधून धैर्यशील माने ८७ हजार मताधिक्यांनी विजयासमीप पोहोचले आहेत. 

►'राजू शेट्टींना दहा दहा वर्षापूर्वी जागा दाखवयची होती ती दाखवली'

राजू शेट्टी यांचा नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव हा नक्कीच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणार आहे यात शंका नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार खा. राजू शेट्टी हे हॅट्ट्रिक करणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते, पण  निकाल बदलला आहे. 

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत २३ एप्रिलला अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. हातकणंगले मतदारसंघासाठी ७०.२८ टक्के मतदान झाले होते.

►बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

माजी खासदार निवेदिता माने बंगल्यावर भगवा ध्वज लावताना

धैर्यशील माने समर्थकांचा जल्लोष