Sat, Aug 24, 2019 09:47होमपेज › Kolhapur › हवेत गोळीबार, लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरेंवर गुन्हा दाखल 

हवेत गोळीबार, सरपंच शशिकांत खवरेंवर गुन्हा  

Published On: Nov 08 2018 12:10PM | Last Updated: Nov 08 2018 12:29PMकोल्हापूर (शिये) : वार्ताहार

पुलाची शिरोली( ता हातकणंगले) येथे लक्ष्मी पुजनाचे निमित्ताने आत्मसंरक्षणासाठी  परवाना असलेल्या बारा बोअर च्या बंदुकीने आणि पिस्तुलाने हवेत गोळीबार केल्या प्रकरणी शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्या विरोधात शिरोली एमआयडिसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंचाने अशा प्रकाराचे कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे .

शिरोली पंचक्रोशीतील शिरोली हे गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. शिरोली गावचा मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत बुधवारी रात्री लक्ष्मी पुजनाच्या वेळी शिरोली गावचे सरपंच शशिकांत खवरे यांनी आत्मसंरक्षणासाठी असलेल्या बारा बोअर बंदुकीने दोन व पिस्तुलाने तीन फैरी झाडल्या.  भरचौकात अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हवेत गोळीबार केला.  हवेत गोळीबार करत असल्याचा व्हिडिओ व्हाटस् अँपवर व्हायरल करण्यात आला असून या व्हिडिओच्या व गोपनीय माहितीच्या आधारावर सरपंच खवरे यांच्या वर गुन्हा दाखल केला असून खवरे यांना अद्याप अटक झालेली नाही .

शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली शिरोली ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करत सरपंच होण्याचा मान हि त्यांना मिळाला. ऐण सणासुदीच्या काळात खवरे गटाच्या ग्रामपंचायत सदस्या जातिच्या दाखल्यावरून दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे असताना मात्र एकीकडे सरपंच शशिकांत खवरे यांनी हवेत गोळीबार करून आपल्या पदाचा अवमान केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. पण हा गोळीबार खवरे यानी स्टंन्टबाजी करण्यासाठी केला असल्याचे दिसून येते आहे. 

पोलिसांनी घटनास्थळावरून लाल रंगाच्या रिकाम्या दोन पुंगळ्या पिवळ्या धातूने बंद असलेल्या सदर पिवळ्या धातुवर १२ के फि असे छाप असलेले लाल रंगाचे प्लॅस्टीक आवरणावर स्पेशल ६५ एम एम / ३० ग्रॅम गोला बारूद फॅक्टरी खडकी असे छापिल असलेले व २०००० रूपये त्यात बारा बोअर बंदुक एक, दोन नळ्या असलेली लाडकी व लोखंडी बनावटीची तिचे एका बाजूस मॉडर्न गन वर्क्स इंडिया ३०५२४ असे छापील असून दुसर्या बाजूस मॉडर्न्स असे त्याच्या खालिल बाजूस सिंहस्तंभ छापील आहे साहित्य मिळाले. भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकार तर्फे महादेव आकाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास करवीर विभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.