होमपेज › Kolhapur › पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सत्कार : सावित्रीच्या लेकींनी सत्कार करणे हे तुमचे भाग्य - शरद पवार

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सत्कार : सावित्रीच्या लेकींनी सत्कार करणे हे तुमचे भाग्य - शरद पवार

Published On: Jan 13 2019 11:01AM | Last Updated: Jan 13 2019 6:26PM
गडहिंग्लज : पुढारी ऑनलाईन

येथील नगरपरिषदेतर्फे दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिल्पाकृती, शाल, श्रीफळ, मानपत्र देण्यात आले. तसेच यावेळी केक कापण्यात आला. गडहिंग्लज नगरपरिषद तसेच आजरा चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, पं. समिती सभापती विजयराव पाटील यांच्यासह पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी सत्कार समिती गडहिंग्लज-आजरा-चंदगडचे सदस्य उपस्थित होते. सत्कार कार्यक्रमाला डॉ. जाधव यांच्या कामगिरीवर नितांत प्रेम करणारे तिन्ही तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा कोरी आणि आ. संध्यादेवी कुपेकर यांनी पुढारीकार ग. गो. जाधव यांची परंपरा समर्थपणे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव चालवत असल्याचे सांगितले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिते कार्य डॉ. जाधव भक्कमपणे पार पाडत असल्याचा गौरव त्यांनी केला. यानंतर दत्ता देशपांडे सर यांनी पद्मश्री डॉ. जाधव यांच्या मानपत्राचे वाचन केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुरुवातीलाच आ. हसन मुश्रीफ यांच्या मातोश्रींना आदरांजली वाहिली. तसेच खा. पवार यांच्याहस्ते हा सत्कार होणे ही बाब अत्यंत सुखद असल्याचे ते म्हणाले.  

दैनिक पुढारी मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

आ. मुश्रीफ यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने उपस्थित राहू शकले नाहीत

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडून मुश्रीफांच्या मातोश्रींना श्रद्धांजली

हा सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे

शरद पवारांच्या हस्ते सत्कार होणे हा सुखद योगायोग

धुरंधर, मुत्सदी लोकनेते शरद पवार सत्कारासाठी उपस्थित राहिले यासाठी आभार

हा सत्कार म्हणजे पुढारीच्या लाखो वाचकांचा सत्कार

मी कृतज्ञतापूर्वक पुरस्काराचा स्वीकार करतो

पुढारी दैनिक राहिले नसून लोकचळवळ झाली आहे

सामान्य नागरिकाला जे अधिकार तेच दैनिकाला आहेत

दैनिकाला अनिर्बंध स्वातंत्र्य आहे असे काही समजू नये

तंत्रज्ञान बदलले माध्यम बदलले तरी पत्रकारितेचा आत्मा बदलणार नाही

पत्रकार साहित्यिकाच्या दोन पावले पुढे असतो

सत्काराने माझी जबाबदारी वाढली आहे

पुढारीची सूत्रे हाती घेऊन ५० वर्षे झाली आहेत

मला पूर्ण स्वातंत्र्य देणार असाल, तर मी सूत्रे हाती घेणार अशी भूमिका

आबांनी त्यानुसार सूत्रे दिली त्यानंतर कार्यभार स्वीकारला

आबांची भूमिका मवाळ होती, पण माझी भूमिका आक्रमक होती

पुढारीचा हिरकमहोत्सव लतादीदींच्या हस्ते झाला

पुढारी अमृतमहोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला

मी अलिप्त राहिल्यानेच पुढारी सर्वपक्षीय व्यासपीठ आहे

पुढारीच्या कार्याला म्हणूनच सर्वपक्षीय लोक येत आहेत

वि. वा. शिरवाडकर पुढारीचे वार्ताहर होते

. मो. मराठे यांच्यासारखे साहित्यिक पुढारीने निर्माण केले

पुढारी बहुजन समाजाचे हक्काचे व्यासपीठ झाले आहे

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीमधील संग्रामला पुढारीने बळ दिले

सियाचिन रुग्णालय, कोल्हापुरात अखिल भारतीय साहित्य संमेलन, पूरग्रस्तांना मदत पुढारीकडून झाली आहे

कोल्हापूरकरांनी खऱ्या अर्थाने जागवलेले स्वप्न पुढारी आहे

टोल, आरक्षण मुद्यावर पुढारी अग्रेसर राहिला आहे

स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्यामध्ये बदल आवश्यक आहे

कोणतेही माध्यम येऊ दे, पत्रकारितेचा आत्मा तोच राहणार आहे, तो कधीच बदलणार नाही 

पवार आणि आमच्यामध्ये मतभेद जरूर आहेत, पण मनभेद नाहीत

पवार हे राज्याचे नेते नसून देशाला लाभलेले नेते आहेत

वयाच्या तिसऱ्या दिवसापासून पवारांची सार्वजनिक जीवनाची सुरूवात झाली आहे

पवार साहेबांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे

पवारांमधील अनेक राजकीय गुण मला भावतात

लोकांच्या प्रश्नांची सखोल जाण पवारांना आहे

------

खा. शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

येथे महिलांचा आदर होतो येथील महिलांच्याकडे प्रमुख्याने नेतृत्व आहे

आमदार महिला आहेत, नगराध्यक्ष महिला आहेत, आजऱ्याच्या सभापती महिलाच आहेत

राज्यातील संपादकांच्या कर्तृत्वाचा गौरव

कोल्हापूरमध्ये समाजहिताच्या सर्व भूमिका पुढारीने वेळोवेळी घेतल्या

ग. गो. जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पद्मश्री प्रतापसिंह जाधव चालवत आहेत

त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा हा सत्कार आहे

या परिसरात नेतृत्व करणाऱ्यांच्या पोटी मुलीच येतात हे वैशिष्ट्य आहे

तसेच येथील लोक लेकांनी नेतृत्व देत आहेत हेही महत्वाचे आहे

देशात ५० टक्के महिलांच्या हाती नेतृत्व असले पाहिजे हेच हा भाग सार्थ करत आहे

सावित्रीच्या लेकींनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे

सावित्रीच्या लेकींनी केलेला हा सत्कार महत्वाचा आहे

सावित्रीच्या लेकींनी सत्कार करणे हे तुमचे भाग्य आहे

ग. गो. जाधव यांचे लिखाण, विचार हेच पुढे नेण्याचे कार्य साहेब करत आहेत

 

LIVE : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सत्कार सोहळा

कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार. समोर उपस्थित नागरिक

कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार. 

कार्यक्रमात बोलताना दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव. 

व्यासपीठावर उपस्थित दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव,  माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार आणि इतर मान्यवर. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करताना माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार, दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि इतर मान्यवर.

सत्कार कार्यक्रमाला दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कामगिरीवर नितांत प्रेम करणारे तिन्ही तालुक्यातील उपस्थित नागरिक.