Mon, Sep 16, 2019 05:43होमपेज › Kolhapur › महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध : खा. महाडिक

महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध : खा. महाडिक

Published On: Mar 06 2019 1:46AM | Last Updated: Mar 06 2019 1:28AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी

महिलांच्या सबलीकरणाचे आणि आरोग्याचे प्रश्‍न मांडून संसदेत आवाज उठवला. त्यामुळेच देशभरातील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळवून देण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला. महिलांचे प्रश्‍न सोडविण्यिासाठी नेहमीच कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. 

राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान खा. महाडिक यांनी संसदेत विविध प्रश्‍नांवर आवाज उठवून महिला सबलीकरण चळवळ पुढे नेली, असे गौरवोद‍्गार गोकुळ संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी काढले.

 राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. राजेश्‍वरी डोंगळे यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसचे हिंदुराव चौगले यांनी मनोगत व्यक्‍त केले. आघाडी धर्म पाळून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

गोकुळचे संचालक अरुण डोंगळे म्हणाले, महिलांच्या प्रगतीसाठी खासदार महाडिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी बचत गटांच्या चळवळीमार्फत राबवलेल्या योजनांची माहिती दिली. 

यावेळी भैया डोंगळे, पी. डी. धुंदरे, हिंदुराव चौगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले, मार्केट कमिटी उपाध्यक्ष संगीता पाटील, सरपंच सुवर्णा कांबळे, राजेश्‍वरी डोंगळे, भाग्यश्री डोंगळे, युवा शक्‍ती राधानगरी तालुका अध्यक्ष शेखर पाटील, विजय महाडिक  यांच्यासह राधानगरी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.