Mon, Sep 16, 2019 11:42होमपेज › Kolhapur › पवारच महाडिकांना पाडतील : चंद्रकांत पाटील 

पवारच महाडिकांना पाडतील : चंद्रकांत पाटील 

Published On: Apr 18 2019 2:29PM | Last Updated: Apr 18 2019 2:19PM
गारगोटी : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या जनतेचा राग महाडिक यांच्यावर असून महाडिकांना संपवण्यासाठीच पवारांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाघापूर येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना केला. युवक नेते सचिन दादा घोरपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील प्रमुख उपस्थित होते.

ते पुढे बोलताना म्हणाले एका विश्वसनीय सर्व्हेनुसार शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक सुमारे नव्वद हजार मताच्या पुढे आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पैसा, गाडी, सहली यासारखी वेगवेगळी आमिषे दाखवली जाणार. स्वाभिमानी मतदार या मोहाला बळी पडणार नाहीत. राहिलेले दिवस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून जागे राहून काम करावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले.  मोदींच्या नेतृत्वाखालील देश सुरक्षित राहू शकतो. देशाच्या सीमा सुरक्षित राहू शकते याची जाणीव जनतेला झाली आहे. त्यामुळे मतदार मोदींच्या हाती सत्ता सोपवतील असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते  के. जी. नांदेकर, माजी उपसभापती सत्यजित जाधव, जीवन प्राधिकरण समितीचे सदस्य प्रवीणसिंह सावंत, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, धनाजी खोत, अजित देसाई, अलकेश कांदळकर,  पंचायत समिती सदस्य आक्काताई नलवडे, योगेश परुळेकर, शिवाजी ढेंगे, उपसरपंच बाजीराव जठार, धोंडीराम बरकाळे, यशवंत कुरडे, संतोष बरकाळे, नामदेव चौगुले, दिलीप केणे आदींसह सर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.