Mon, Jun 17, 2019 10:17होमपेज › Kolhapur › ‘कृषी’तील कर्मचार्‍यांना लवकरच पदोन्‍नती

‘कृषी’तील कर्मचार्‍यांना लवकरच पदोन्‍नती

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:20AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कला, क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळविणार्‍या कृषी खात्यातील खेळाडूंना बढत्या व 336 कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्‍नती देण्यात येतील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

कृषी विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता येथील पोलिस परेड ग्राऊंडवर आयोजित राजस्तरीय कला, क्रीडा महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सोमवारपर्यंत चालणार्‍या या  स्पर्धेत  34 जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला आहे. 

ना. खोत म्हणाले, कृषी खात्याने या घटकाचे संरक्षण करण्याची गरज आहे. जे खेळाडू पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावतील त्यांना बढती देण्यात येईल. 

कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह म्हणाले, कोणत्याही खेळात हार, जित असते, पण प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जपावी. यावेळी कुस्ती प्रशिक्षक राम सारंग, कबड्डीपटू तुषार पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास संचालक विजयकुमार इंगळे, संचालक शरद पोकळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, विभागीय अधीक्षक उमेश पाटील, कृषी पर्यवेक्षक संघटना अध्यक्ष अतुल जाधव, संतोष पाटील करत आहेत.