Sun, Nov 17, 2019 08:21होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : एसटीची ट्रकला धडक; 27 प्रवासी जखमी

कोल्हापूर : एसटीची ट्रकला धडक; 27 प्रवासी जखमी

Published On: Jul 12 2019 2:39PM | Last Updated: Jul 12 2019 2:56PM
उजळाईवाडी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी (ता. करवीर) येथील बसस्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आजरा-कोल्हापूर  एस.टी. बसने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. ट्रकने त्यानंतर रस्त्यालगतच्या दुचाकीलाही धडक दिली. या तिहेरी अपघातात एस.टी.मधील 27 प्रवासी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तत्काळ सीपीआर येथे दाखल केले. 

शालिक चंद्रकांत कनाके (वय 42, रा. आजरा, मूळगाव पनोरे, जि. चंद्रपूर) हा एसटी (एमएच 14 बीटी 4220) आजरा बसस्थानकातून कोल्हापूरला निपाणीमार्गे घेऊन जात होता. कणेरीवाडीजवळ तो आला असता महामार्गावर डाव्या बाजूस थांबलेल्या ट्रकला (एमएच 09 सीयू 3636) मागून जोराची धडक दिली, तर ट्रकचालकाबरोबर दुचाकीस्वार (एमएच 09 डीजी 6940) ट्रकच्या समोर दुचाकी उभा करून  केबिनमध्ये बोलत थांबला होता. जोराची धडक बसल्याने ट्रक पुढे गेला आणि दुचाकीला धडकला. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. 

ट्रकला धडक दिल्यामुळे  एसटीचा दर्शनी भाग पूर्ण चेपला असून प्रवासी समोरच्या लोखंडी पाईपला धडकून जखमी झाले. जखमींना सीपीआर येथे उपचारासाठी नेले. याबाबत ट्रकचालक सूरज बाबुराव भोसले (रा. कागल) यांनी फिर्याद दिली असून एसटीचालक कनाके याच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
जखमींची नावे अशी : रघुनाथ बंडू लोकरे (वय 50, रा. आणूर, ता. कागल), शिवाजी धोंडिराम हजारे (55, रा. दिंडनेर्ली), बसवेश्‍वर मल्लाप्पा मगदूम (62, रा. निपाणी), धोंडीबा सदू मणगूतकर (58, रा. गणेशवाडी, ता. आजरा), शांताबाई बाबुराव जाधव (55, रा. कागल), नंदा नेताजी झेंडे (38, रा. आजरा), मैनुद्दिन निजाम देसाई (68, रा. कळंबा), सुंदराबाई गोपाळ दरेकर (55, रा. मुरगूड), अश्‍विनी सागर माने (27, रा. चिकोडी), महेश शंकर खटागळे (24, रा. व्हनाळी, ता. आजरा), बाबुराव भिवा जाधव (73, रा. कागल), आनंद बापू बामणे (61, रा. तळेगाव, पुणे), धावरू लालसिंग जाधव (51, ता. भुदरगड), मारुती शंकर भोरे (43, रा. चव्हाणवाडी, ता. आजरा), वैभव तातोबा घावरे (25, रा. आजरा), रत्नाकर विष्णू सुतार (43, रा. आजरा), नंदा नारायण चौगुले (60, रा. कागल), युवराज बळवंत हरमळकर (38, रा. आजरा), हिराबाई पांडुरंग आसबे (65, रा. कागल), आनंदा राजाराम पाटील (45, रा. मलगे), सुमन बाजीराव दरेकर (45, रा. पेनिग्रे, ता. कागल), शिवाजी बाळासाहेब पाटील (19, रा. करनूर), अमृता चंद्रकांत शिरोडे (19, रा. चिकोडी), श्यामराव रानबा कांबळे (48, रा. हरपवडे), राजेंद्र शंकर पाटील (60, रा. चिकोडी), नेताजी झेंडे (40, रा. आजरा), शेखर मोहिते (30, रा. कुरली, ता. चिकोडी). 

रुग्णवाहिकेची तत्काळ मदत

सीपीआर, उचगाव येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेतून जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. जखमींना तत्काळ सीपीआरमध्ये नेले. या पथकामध्ये डॉ. आदर्श चिंदके, डॉ. सुचित्रा जाधव, डॉ. सुनील ताडे, चालक महेंद्र कुडाळकर, धनाजी मोरे, समन्वयक संग्राम मोरे यांचा सहभाग होता.