Fri, Jan 24, 2020 04:52
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात

राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात

Published On: Apr 23 2019 2:53PM | Last Updated: Apr 23 2019 6:34PM
कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, मंगळवारी होत आहे. प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. लोकशाहीच्या उत्सहात अबाल वृद्धापासून ते युवा वर्गात आपला हक्क बजावण्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघात वधु आणि वर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी आधि लगीन लोकशाहीचे म्हणत मतदानाचा हक्क बजावत आहेत. यांच्यासारखा लोकशाही प्रती असणारा हक्क बजवण्यासाठी १०० वर्षाच्या आजीने मतदान केले आहे. कोल्हापुरात दुपारपर्यंत ५४.२४ टक्के मतदान झाले आहे.

या आजीचे नाव सरलाबाई गणपतराव लिंग्रस असे आहे. सरलाबाई या कोल्हापूर येथे राजरामपुरी परिसरात राहतात.  त्यांनी सर्व लोकसभा, विधानसभा, व सर्व निवडणूकीमध्ये आत्तापर्यंत मतदान केले आहे. 

वृक्षप्रेमी असणाऱ्या सरलाबाई ग. लिंग्रस यांनी कोरेगवाकर हॉल या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. तसेच १०० वर्षाच्या या आजीचे वृक्षांची लागवड आणि जोपासना तसचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के मतदान झाले आहे.  दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ४० टक्के मतदान झाले आहे.  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, मंगळवारी होत आहे. यानिमित्ताने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान,  कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात पेटीएमद्वारे पैसे वाटप करताना दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

पाचगाव मतदान केंद्रातील मतदान यंत्र बंद पडले आहे

शिरोळ तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान झाले एकूण तीन लाख 12 हजार 495 पैकी 1, 67951 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.

कागल विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजे पर्यत 54.47 टक्के मतदान झाले कोठेही अनुचित प्रकार नाही शांततेत मतदान प्रक्रीया सुरु आहे आ.हसन मुश्रीफ यानी लिगनुर दुमाला येथे मतदान केले

मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखविले जात असल्याचा प्रकार कोल्हापुरात उघड झाला आहे. त्याविरोधात कारवाई करण्यात आली असून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.    

दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी माईसाहेब बावडेकर स्कुल या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला

उर्वरित महराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ योगेश जाधव यांनी माईसाहेब बावडेकर स्कुल या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी न्यू पॅलेस मनपा शाळेत मतदानाचा हक्क बजावला

कोल्हापूर : शिवसेना अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांनी सहपत्नी वेदांतिका  माने यांच्यासह मतदानाचा  हक्क बजावला

खासदार धनंजय महाडिक यांनी सहकुंटूबासहित मतदानाचा हक्क बजावला

मौजे सांगाव च्या ११३ वर्षाच्या आजीने केले.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील केंद्र क्रमांक ५० वर श्रीमती कमलाबाई लक्ष्मण हेगडे (वय ११३) या आजीने आपल्या नातवंडे ,प्रतवंड्यासह  कुटुंबातील १४ व्यक्तीने एकाच वेळी केले मतदानाचा हक्क बजावला. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार सुरू असलेल्या सर्वच सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती दिली. त्यांच्या प्रेरणेतून कुटुंबातील सर्वांनीच एकाच वेळी मतदानाचा हक्क बजावला आहे.

शिरोळ तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत 53.75 टक्के मतदान झाले एकूण तीन लाख 12 हजार 495 पैकी 1, 67951 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.

कागल विधानसभा मतदार संघात दुपारी तीन वाजे पर्यत 54.47 टक्के मतदान झाले कोठेही अनुचित प्रकार नाही शांततेत मतदान प्रक्रीया सुरु आहे आ.हसन मुश्रीफ यानी लिगनुर दुमाला येथे मतदान केले