Fri, Feb 22, 2019 14:41होमपेज › Kasturi › आजची रेसिपी : उपवासाचे चाट   

आजची रेसिपी : उपवासाचे चाट   

Published On: Feb 12 2018 3:19PM | Last Updated: Feb 12 2018 4:23PMपुढारी ऑनलाईन

‘एकादशी अन् दुप्पट खाशी’ ही म्हणं खवय्यांना तंतोतंत लागू होते. वार कोणताही असो त्यांना नेहमीच चमचमीत, चटकदार असं काहीतरी खायला हवं असत. असंच झालय घरातील बालचमूंचं. उद्या ‘महाशिवरात्री’ची एकादस आहे. मुलं उत्साहानं म्हणतात की, ‘आम्हीही उपवास करणारं’ अशावेळी उपवासाला चालेल आणि मुलांना पचेल असं काहीतरी खायला बनवायला हवं. म्हणूनचं ट्राय करा...‘उपवासाचे चाट’

चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

४ बटाटे, १ रताळे, १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे

३ ते ५  वाटी बटाट्याचा तिखट-गोड चिवडा

२ ते ३  वाटी तळलेले शेंगदाणे

२ ते ३  वाटी हिरवी चटणी 

२ ते ३ वाटी चिंचगुळाची चटणी

तूप किंवा शेगदाण्याचे तेल 

काळं आणि साधं मीठ

१ वाटी दही 

कृती 

रताळे, बटाटे सोलून घ्याऊन त्याचे मध्यम आकारात तुकडे करावेत.

तूप गरम करून त्यात बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्याच्या फोडी तळून घ्याव्यात.

प्लेटमध्ये बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्यातुकडे घालावेत.

काळे मिठ, दही, हिरवी आणि चिंच गुळाची चटणी, तळलेले शेंगदाणे आणि बटाट्याचा चिवडा घाला. 

त्यावर थोडी कोथंबिर घालावी. आणि सर्व्ह करा ‘उपवासाचे चाट’

खवय्ये असाल तर वाचा या बातम्या 

आजची रेसिपी : स्पेशल ‘रगडा’

आजची रेसिपी : खुसखुशीत आलू टिक्की

आजची रेसिपी; झटपट रव्याचा डोसा

आजची रेसिपी : चविष्ठ ‘ब्रेडची कचोरी’