Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Kasturi › दै. पुढारी कस्तुरीचा सुगंध आता म्हैसाळमध्ये

दै. पुढारी कस्तुरीचा सुगंध आता म्हैसाळमध्ये

Published On: Nov 13 2017 2:02AM | Last Updated: Nov 11 2017 9:06PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

म्हैसाळ येथे दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबचा ओळख व मेंबरशिप कार्यक्रम थाटामाटात झाला. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांची सभासद नोंदणी करण्यात आली. 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे, शिबिरांचे आयोजन  केले  जाते. यातून  महिलांसाठी नवीन व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न क्‍लबतर्फे करण्यात  येत आहे. यावेळी महिलांना कस्तुरी क्‍लबविषयी माहिती देण्यात आली.  दै. पुढारीचा कस्तुरी क्‍लब हा एक चांगला उपक्रम म्हणून पाहिले पाहिजे, असे मत महिलांनी व्यक्त केले. यावेळी महिलांनी आपले चांगले-वाईट अनुभव सांगितले.  या कार्यक्रमात तरुणीं, गृहिणी तसेच वृध्द महिलांनी सहभाग घेतला व सभासद नोंदणी केली.

कस्तुरी क्‍लबचे सभासद होण्यासाठी नोंदणी फी 500 रुपये आहे. यावेळी सभासदांना लगेचच एक नॉनस्टीक कढई भेट म्हणून मिळणार आहे. महिलांनी  पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, गीतांजली पाटील -मोबाईल : 8805007176  येथे संपर्क करावा. विविध उपक्रमांसाठी कस्तुरी क्‍लब कमिटी लीडर निवडणे सुरू आहे. इच्छुक महिलांनी कस्तुरी क्‍लब  दै. ‘पुढारी’ भवन येथे  नाव नोंदणी करावी.