Wed, Oct 24, 2018 02:00होमपेज › Kasturi › नृत्यांगणांची अदाकारी, कस्तुरींचा जल्‍लोष

नृत्यांगणांची अदाकारी, कस्तुरींचा जल्‍लोष

Published On: Dec 02 2017 5:53AM | Last Updated: Nov 30 2017 8:49PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

जोश, जल्‍लोष, ओसंडून वाहणारा उत्साह, शिट्ट्यांची बरसात, टाळ्यांचा कडकडाट आणि नृत्यांगणांच्या एकाएका  अदाकारीला मिळणार्‍या उत्स्फुर्त प्रतिसादात दै. पुढारी कस्तुरी  क्लबच्या सदस्यांनी ‘अप्सरा आली’ लावणी कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने हजेरी लावत  लावण्यांचा  मनमुराद आनंद लुटला. प्रत्येक लावणीला उत्स्फुर्त प्रतिसाद देत तालासुरावर थिरकणार्‍या महिला व नृत्यांगणांसह हॉल दणाणून गेला. 

दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या  ‘अप्सरा आली’ सिनेतारका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांच्या ठसकेबाज लावणीच्या कार्यक्रमाचा महिलांनी मोठ्या संख्येने मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत, कार्यक्रमाच्या प्रायोजक स्टुडिओ 11 सलून अ‍ॅण्ड स्पा च्या नर्गिस रानोद, प्रज्ञा शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेविका सौ. विद्या पावसकर, सौ. अर्चना ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती  होती. स्वागत दै. पुढारीचे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे यांनी केले. यावेळी वरिष्ठ उपसंपादक अमोल चव्हाण, मार्केटिंग प्रतिनिधी विकास पाटील यांची उपस्थिती होती. 

‘लावणी’ म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेतील महत्वाची कला. नृत्य कलेतील वैशिष्ट्यपूर्ण आणि  वेड लावणारी लावणी मात्र महिलांसाठी तशी दुर्मिळच. यामुळेच ‘कस्तुरी क्लब’च्या सभासदांसाठी  या लावणीचे आयोजन केले होते.  ‘या रावजी बसा भावजी’,‘कैरी पाडाची’,   ‘कुणीतरी न्याहो मला फिरवायला’, ‘सोडा सोडा राया नाद खुळा’, ‘शांताबाई...’ ‘झिंगाट’ आदी ठसकेबाज गाण्यांवर महिलांनी नृत्यांचा फेर धरला.  ‘झाल्या तिन्ही सांजा’ हे गाणे अर्चना सुतार यांनी स्वत: गाऊन त्यावर नृत्य केले. प्रत्येक गाण्याला कस्तुरींकडून वन्स मोअर मिळत होता. रंगमंचावर जावून युवतींनी नृत्यात सहभाग घेतला.  सूत्रसंचालन श्रूती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेश्मा मिस्त्री, ज्योती कोपर्डे, अनिता शेट्ये, सरस्वती पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.