Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Kasturi › कस्तुरी सभासदांनी जिंकला ‘आपला गाव’

कस्तुरी सभासदांनी जिंकला ‘आपला गाव’

Published On: Nov 14 2017 2:22AM | Last Updated: Nov 14 2017 12:58AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी.

दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब सभासदांनी ‘आपला गाव’ अक्षरश: जिंकला...अस्सल ग्रामीण संस्कृतीची नव्याने ओळख करून देत रानावनात फिरण्यासह बैलगाडीची सवारी...ट्रॅक्टर सवारी....झाडाला बांधलेल्या झोक्यावर रमण्याचा मनमुराद आनंद कस्तुरी सभासदांनी घेतला. कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित सहल अतिशय उत्साहात संपन्न झाली. आपल्या गावाच्या आठवणी मनात साठवून कस्तुरींनी सायंकाळी गावाचा निरोप घेतला.

कराडजवळील ‘आपलं गाव’ येथे शनिवारी एकदिवसीय सहल आयोजित केली होती. गाणी...गप्पा आणि एकमेकींसोबत धमाल करीत दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या सभासदांनी सकाळी लवकरच आपला गाव गाठला होता. गावात पाय ठेवताच कस्तुरी सभासदांचे स्वागत झाले. निसर्गाच्या सहवासात आणि पक्ष्यांच्या चिवचिवाटाचा सुखद सूर कानावर पडत होता. कडक चहा आणि न्याहारीने दिवसाची सुरुवात झाली. यानंतर कस्तुरी सभासदांनी बैलगाडी आणि ट्रॅक्टच्या सवारीने सगळा गाव फिरून पाहिला. 

रानावनात फिरून दुपारी झाडाला बांधलेल्या झोक्यावर झुलण्याचा मनमुराद आनंद सभासदांना घेता आला. याशिवाय कॅरम, संगीत खुर्चीसह अनेक खेळ खेळता आले. दुपारी लज्जतदार आणि झणझणीत जेवणाची चव चाखून कस्तुरी सभासदांनी थोडा विसावा घेतला. 

संपूर्ण दिवसाच्या खेळानंतर रेन डान्सची मजाही कस्तुरी सभासदांना घेता आली. सायंकाळी कडक चहाचा अस्वाद घेऊन कस्तुरींनी गावाचा निरोप घेतला. कस्तुरी क्लब सभासद नोंदणी संपर्क टोमॅटो एफ. एम. 0231-6625943, मो. : 8805007724, 8805024242.