Sat, Sep 21, 2019 07:01होमपेज › Kasturi › पावसाळ्यात फॅशनेबल राहताना...

पावसाळ्यात फॅशनेबल राहताना...

Published On: Jun 13 2019 1:28AM | Last Updated: Jun 12 2019 8:09PM
पावसाळ्यात पार्टी करायची किंवा फिरायला जायचे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न भेडसावतो, तो म्हणजे कपडे कोणते घालायचे? 

  पावसाळा म्हणजे पाणी आणि चिखल. चांगले कपडे खराब होण्याची शक्यता सर्वाधिक. त्यामुळेच या काळात कपड्यांची योग्य निवड महत्त्वाची ठरते. यासाठी काही पर्याय... 

• टी-शर्ट आणि शॉर्ट ः पावसाळ्यात लांब ड्रेस घालणे म्हणजे ड्रेस खराब करून घेणे. म्हणूनच या मोसमात शक्य झाले तर आखूड ड्रेस घालावेत. पार्टीत घालू शकता असा टी-शर्ट किंवा शॉर्ट असेल तर चिंताच नको. कारण पावसाळ्यात पार्टीसाठी हाच योग्य पेहराव आहे. 

• टी-शर्टबरोबर रोल्ड बॉटम ः ही डेनिम आपल्या सोयीनुसार खालून फोल्ड करू शकता.

• स्लिव्हलेस टी-शर्ट बरोबर जॅकेट घालता येते. जॅकेटमुळे आपण जास्त स्टायलिश आणि कूल दिसू शकता. हा लूक व्यक्‍तिमत्त्व आकर्षक करतो. 

• पंजाबी ड्रेस घालायचा असेल तर त्याखाली सलवार न घालता लेगिन्स घालाव्या. त्यामुळे जर पाऊस आलाच तर त्या खालून वर दुमडून चालता येते. पावसाळ्यात चामड्याची पादत्राणे कटाक्षाने टाळावीत. कारण ते भिजून खराब होतात. त्यामुळे फ्लिप फ्लॉप आणि आणि रंगीत कॅनव्हास शूज या वातावरणासाठी उत्तम आहेत. ते घालून पावसात भिजण्याची मजा लुटता येईल.  पावसाळ्यात लवकर सुकणारे कपडे घालावेत.  

यामुळे जीन्स घालण्याऐवजी कॉटन पँट किंवा सिल्कच्या पलाझो वापराव्यात.  स्कर्टही वापरू शकता. पण तो शक्यतो फार लाँग नसावा.