Fri, Jun 05, 2020 02:24होमपेज › Kasturi › स्टाईल ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटची !

स्टाईल ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटची !

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 16 2019 2:00AM
जान्हवी शिरोडकर

फॅशनविश्‍वात हल्ली ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कॉम्बिनेशनला मोनोक्रोम म्हटलं जातं. आपल्याकडे कितीही रंगीत कपडे असोत, त्यात एक ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस असायला हवा असं हल्ली अनेकजणींना वाटतं. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कॉम्बिनेशनचा विचार तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात कसा करता येऊ शकतो, याविषयी...

ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनचा ट्रेंड खरंतर एव्हरग्रीन म्हणायला हवा. कधीही कसंही वापरा, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन अत्यंत सुबक व आकर्षक दिसत आहे. अर्थात थोडं बारीकसारीक गोष्टींचं भान ठेवलं तर या कॉम्बिनेशनद्वारे तुमचा लूक बदलणंही शक्य होईल. विशेषत: तुम्ही थोड्या जाड असाल तरीदेखील ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कॉम्बिनेशनचा तुम्हाला देखणा पेहराव म्हणून यथायोग्य उपयोग करून घेता येईल.

आता तुम्ही जर थोड्या जाड असाल तर काही मुद्दे जाणीवपूर्वक लक्षात घेऊन ड्रेस कॉम्बिनेशन्स करणे तुमच्या हिताचे ठरेल. मुख्य म्हणजे तुमच्या मांड्यांचा आकार लक्षात घेऊन कपड्यांची निवड सजगपणे करा. यासाठी ब्लॅक टॉप आणि बॉटम निवडा किंवा प्रिंटेड ब्लॅक अँड व्हाईट शर्ट घ्या. यासोबत प्लेन ट्राऊजर किंवा स्कर्टही घालता येऊ शकतो. गरज वाटल्यास लेगिंगसोबत पेअरही करता येईल. तुमच्याकडे बिनबाह्यांचा ड्रेस आहे आणि तुम्हाला तो वापरायचा असेल, तर त्यासोबत श्रग किंवा जॅकेट नक्की वापरा. त्यामुळे तुमचं व्यक्‍तिमत्त्व उठावदार दिसेल.

काहीवेळा पेयरिंग करण्याऐवजी तुम्ही स्टायलिश लेयरिंगही करू शकता. जर तुम्हाला जीन्स आणि टॉपवर काय घालायचं, हे सुचत नसेल तर जॅकेट, किमोनो किंवा कोट लेयरिंग करावं. यासाठी चौकड्यांचे कोट, सिंपल जॅकेट किंवा काळं-पांढरं श्रग वापरता येऊ शकेल. योग्य पेअरिंग, लेअरिंग व कॉम्बिनेशन्स केल्याने तुमचा लूक उठावदार तर होईलच शिवाय नानाविध रंगसंगतींचा विचार करून बोअर झालेल्या तुमच्या मेंदूला जरासा वेगळेपणाही अनुभवायला मिळेल; नाही का?