होमपेज › Kasturi › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित ‘चला नाती जपूया’

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित ‘चला नाती जपूया’

Published On: Jun 04 2018 1:09AM | Last Updated: Jun 04 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार व प्रसिद्ध वक्त्या अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थंकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कुटुंबातील नातेसंबंध व संवाद याविषयी ‘चला नाती जपूया...’ यामध्ये थोडे भावनिक तर थोडे कठोर  काही मजेशीर तर काही रोखठोक असे भाष्य अपर्णाताईंच्या खास शैलीत ऐकण्याची संधी महिला वर्गाला मिळणार आहे. अपर्णाताई अवघ्या महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली वक्त्या म्हणून ख्यातनाम आहेत. भारतीय परंपरा, कुटुंब पद्धती, जिव्हाळ्याची नाती व त्यातील एकोपा याविषयी त्या अत्यंत प्रभावीपणे बोलतात. 

कौटुंबिक व सांस्कृतिक पातळीवर उद्भवणार्‍या अनेक समस्यांचे मूळ व त्यावरील उपाय अपर्णाताई ओघवत्या शब्दात सांगून जातात. म्हणूनच महिलांनी चुकवू नये असे हे व्याख्यान गुरुवार, दि. 24 मे रोजी दु. 4.00 वा. इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे आयोजित केले आहे. 

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल हे असून हे हॉस्पिटल स्त्री आरोग्य क्षेत्रामध्ये  पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आहे. डॉ. सचिन कुलकर्णी व डॉ. अजित पाटील संचलित या हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कोपिक सर्जरी, सोनोग्राफी, फिटल मेडिसीन, टेस्ट ट्यूब बेबी या सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत. प्रिस्टीन सर्जरी म्हणजेच सुरक्षित सर्जरी हे ब्रीद वाक्य साध्य करण्यासाठी डॉ. प्रिया जैन, डॉ. स्वाती कुलकर्णी, डॉ. विद्या पाटील, डॉ. नंदिता जोशी, डॉ. प्रमोद भोई व डॉ. श्रद्धा मिरजकर ही टीम सतत कार्यरत असते. 

या कार्यक्रमासाठी इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे सांस्कृतिक भवन लग्‍न-मुंजीसह सर्व लहान-मोठ्या समारंभासाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. येथे वधु-वरांसाठी स्वतंत्र खोल्या, स्वतंत्र डायनिंग हॉल व समारंभासाठी उत्तम हॉलची व्यवस्था आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क ः- टोमॅटो एफ एम कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. फोन नं.  : 8805007724,8805024242, ऑफीस : 0231-6625943.