कोल्हापूर : प्रतिनिधी
धुवाँधार पावसातील वर्षासहलीचा आनंद काही वेगळाच. दै. पुढारी ‘कस्तुरी क्लब’ने सभासद व त्यांच्या मैत्रिणींसाठी अशीच एक धमाल वर्षासहल आयोजित केली आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारा राऊतवाडीचा धबधबा हे या सहलीचे खास आकर्षण असणार आहे. ‘कस्तुरी क्लब’तर्फे या एक दिवसीय वर्षा सहलीचे आयोजन बुधवार दि. 18 जुलै रोजी करण्यात आले आहे. या सहलीसाठी ‘कस्तुरी क्लब’ सभासदांना प्रत्येकी फक्त रु. 550 व जे सभासद नाहीत त्यांनी प्रत्येकी 700 रु. शुल्क भरावयाचे आहे.
सहलीचा प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहापान हे सर्व कस्तुरी क्लबमार्फत देण्यात येणार आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात राऊतवाडी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सभासदांनी ‘कस्तुरी क्लब’ आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभासदांनी दि. 10 जुलै 2018 पर्यंत आपली नावे टोमॅटो एफ. एम. कस्तुरी विभाग, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी फोन क्र. ऑफीस- 0231-6625943, मोबा.-8805007724, 8805024242.