Mon, Jun 17, 2019 10:56होमपेज › Kasturi › आनंदाची खरेदी

आनंदाची खरेदी

Published On: Sep 13 2018 1:54AM | Last Updated: Sep 12 2018 8:08PMशुभांगी पासेबंद

खरेदी करणे हा म्हणे एक मानसिक आनंद देणारा चांगला प्रकार आहे. नंबर एकवर Mmstress buster नाही पण आहे. हल्ली पुरुष व स्त्री या दोघांनाही खरेदी करायला आवडते. पूर्वी स्त्रियांच्या खरेदीची खूप टर्र उडवली जाई. पावसाळी खरेदीला पळणार्‍या बायका, सेलमधल्या रद्दीवस्तू, ही विनोदाची विषयवस्तू होती. हल्ली पुरुषसुद्धा खरेदीत रमले गेले आहे. घरात भांडण झाले की बाजारात जा, मॉलमध्ये जा न् खरेदी करा. 

मनोवैज्ञानिकांनुसार प्रेमाचा अभाव भरून काढण्यासाठी बायका खरेदी करतात आणि त्या वस्तू साठवून ठेवतात.(शॉपिंग अण्ड हॅन्डलिंगहेरीवळपस) या खरेदीत पुस्तके, कपडे, दागिने, चपला, सौंदर्य प्रसाधने, पर्सेस, शोभेच्या वस्तू, चादर, पडदे अशा नऊ वस्तूंवर भर असतो. मानवी मनातील पोकळी भरायला बायका खरेदी करतात. श्रीमंत बायका दुपारी कळपाने खरेदीला जातात व अनावश्यक गोेष्टी गोळा करतात. दोज हू से मनी कॅनॉट बाय हॅप्पीनेस डू नॉट नो व्हेअर टू शॉप.

रस्त्यावरच्या वस्तू ,फॅशन स्ट्रीट, मॉल्स, ऑनलाईन शॉपिंग सर्व ठिकाणी खरेदी करणे, या बायकांना आवडते. काहीजणींना भावाची घासाघीस करायला फार आवडते तर काहीजणी फीक्स रेट शॉपमध्ये जातात. खरेदीसाठी आलेल्या व्यक्‍तीला खूश केले तर ती अधिक खरेदी करते. यात दुकानदाराचा धंदा व कमाई होते. खरेदीदाराला आनंद मिळतो. मग स्वत:साठी नाही तर अन्य कुणाला भेट द्यायला होईल म्हणून देखील खरेदी होते.

काहीजणांना मॉलचे वातावरण आवडते, एसी असतो, पॉश माणसे बघायला मिळतात, फिलगुड (चांगले) वाटते म्हणून उगीचच ते मॉलमध्ये चक्‍कर टाकतात. उगीच टाईमपास म्हणून बाजारात चक्‍कर मारणारे ग्राहक असतात. निदान तिथे ते खादाडी करून परत येतात. आदर्श आयुष्य, इतरांना हेवा वाटावा अशी राहणी कशी असावी? तर गाडी- खादाडी - खरेदी असा समज आज समाजातील काहींचा असतो. काहींचे मते परफेक्ट आयुष्य तसे मानले जाते. या खरेदीदारांना बहुतांश हेल्थ हॅप्पिनेस अ‍ॅन्ड मनी हवे असतो. तरुण रहावे वाटणारी मंडळी महागडी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना दिसतात. खूप जगावे असे वाटते ते आरोग्य पुरवणी औषधे घेतात. आपण स्मार्ट असावे, गावठी नको असे लोक खरेदीला ध्येय मानतात; जाहिरातीला भुलतात. आपण चंगळवादाकडे झुकतोय असा आरोप झाला तरी आनंदी राहण्याचा मार्ग जर इतका सोप्पा असेल तर कधीतरी जमले तर खरेदी करून बघावी. चला खरेदी करू या.