Wed, Oct 24, 2018 03:01होमपेज › Kasturi › ‘कस्तुरी’तर्फे मोफत टू व्हिलर प्रशिक्षण

‘कस्तुरी’तर्फे मोफत टू व्हिलर प्रशिक्षण

Published On: Dec 08 2017 1:47AM | Last Updated: Dec 06 2017 10:52PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सभासद महिला व युवतींसाठी  ‘चला टू व्हिलर शिकूया’ या उपक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले असून या ड्रायव्हिंग क्लासला शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 9  वाजता  जिल्हा परिषद मैदान येथे प्रारंभ होत आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे, शिबिरांचे आयोजन  केले  जाते. यातून  महिलांसाठी नवीन व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न क्लबतर्फे करण्यात  येत आहे. यावेळी महिलांना कस्तुरी क्लब व सम्राट हिरोतर्फे महिला व युवतींना टू  व्हिलर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  

‘चला टू व्हिलर शिकूया’ या उपक्रमामुळे महिला व युवतींच्या मनातील गाडी शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यांच्या इच्छाशक्तीला व स्वावलंबी कार्याला चालना मिळणार आहे. महिलांचा आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होईल. तसेच या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिला व युवतींना  मोफत शिकाऊ लायसन्स काढून दिले जाणार आहे. तसेच रस्ता सुरक्षिततेचे नियम, गाडी कशी चालवावी याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. 

‘चला टू व्हिलर शिकूया’ उपक्रमामध्ये दि. 8 ते 10 दरम्यान तज्ञ महिला प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार असून पहिल्या 30 महिलांचे दि. 11 डिसेंबर रोजी मोफत लर्निंग लायसेन्स काढले जाणार आहे. प्रत्येक सहभागी प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, जास्तीतजास्त महिला व युवतींनी ‘पुढारी’ कस्तुरी क्लबची नाव नोंदणी  करुन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.