Sun, Feb 24, 2019 03:03होमपेज › Kasturi › आज सांगलीत ‘हसवा फसवी’चा प्रयोग

आज सांगलीत ‘हसवा फसवी’चा प्रयोग

Published On: Feb 07 2018 1:40AM | Last Updated: Jan 27 2018 10:03PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी  कस्तुरी क्‍लब यांच्यातर्फे रविवारी कस्तुरी सभासदांसाठी ‘हसवा फसवी’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे. हा प्रयोग भावे  नाट्य मंदिर येथे आज (रविवार)  सायं. 4.30 वा. होणार आहे. 

प्रसिध्द अभिनेते पुष्कर श्रोत्री, योगिनी पोफळे, विजय पटवर्धन हे विविध भूमिकेतून ‘हसवा फसवी’ सादर करणार आहेत. या नाटकाचे लेखक दिलीप प्रभावळकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्य प्रदीप मुळ्ये, निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर  आहेत.  या प्रयोगाची तिकिटे  कस्तुरींसाठी 50%  सवलतीच्या दरात मिळणार आहेत. कस्तुरीच्या एका सभासदला ओळखपत्र दाखविल्यानंतर  दोन तिकिटे सवलतीच्या दरात मिळणार आहेत. नवीन सभासद होणार्‍यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ कस्तुरींनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कस्तुरी सभासद नोंदणी सुरू राहणार असून महिलांनी याचा लाभ घ्यावा. 

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत, याचा लाभ घ्यावा.