Thu, Apr 25, 2019 11:43होमपेज › Kasturi › ब्रेसलेट

ब्रेसलेट

Published On: Aug 09 2018 1:39AM | Last Updated: Aug 09 2018 1:39AMफॅशन ही सतत बदलणारी असते. आपण काय पेहराव घालायचा आणि कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घालायच्या त्यातही बदल होतात पण काही अ‍ॅक्सेसरीज हव्याच असतात. पेहरावाबरोबरच हातात घालायचे ब्रेसलेटची निवडही महत्त्वाची असते. विविध प्रकारची ब्रेसलेट बाजारात मिळतात. त्यातीलच एक म्हणजे अस्सल खडे, मोती लावलेले ब्रेसलेट. उत्तम पोशाखाची कळी खुलण्यासाठी खडे, मोती लावलेले बँगल ब्रेसलेट उत्तम दिसते. हे ब्रेसलेट घातल्यावर आपल्या फॉर्मल ड्रेसचा लूक बदलून शाही करू शकतो. तरुण स्त्रिया तर डोळे झाकून पार्टी किंवा शाळेतील नृत्य कार्यक्रमांसाठी घालू शकतात. बँगल ब्रेसलेटला लावलेल्या खड्यांचे रंग पोशाखाला मिळतेजुळते असले पाहिजेत. 

लाकडी ब्रेसलेट : लाकडापासून बनवलले बँगल ब्रेसलेट ने कॅज्युअल लूक मिळू शकतो. किंवा इतर बांगड्यासोबतली लाकडाचे बँगल ब्रेसलेट घालता येऊ शकते. ऑफिसमध्ये एखादवेळी हे ब्रेसलेट घालून जाऊ शकता मात्र ऑफिसच्या कार्यक्रमाला जाताना मात्र हे ब्रेसलेट घालणे टाळावे. 

लेदर बँगल ब्रेसलेट : लेदर बँगल ब्रेसलेट घातल्यास अशिष्ट समजला जाणारा बोहेमियन लूक मिळेल. शाळेतील मुलींसाठी किंवा सुट्टीच्या दिवशी फिरायला जाताना वापरायला लेदर ब्रेसलेट योग्य आहे. लेदर बँगल ब्रेसलेट मणी लावलेल्या बांगड्यांबरोबर किंवा सोनेरी पॉलिश असलेल्या बांगड्यांबरोबर  घातले जाऊ शकते. त्याने थोडा निराळा लूक मिळेल. लेदरची क्लिष्ट कलाकुसर दिसावी यासाठी साध्या मेटलच्या बांगड्यांबरोबर हे ब्रेसलेट घालणे योग्य निवड ठरेल. 

व्हिंटेज आणि पुरातन बँगल ब्रेसलेट : थोड्याशा जुन्या काळाची आठवण करून देणारे अँटिक बँगल ब्रेसलेट विविध धातूंमध्ये मिळते. प्लास्टिक, लाकडी आणि लेदर या ब्रेसलेटच्या तुलनेत मेटल आणि स्फटिक यांचे ब्रेसलेट अधिक चांगले दिसते. अर्थातच व्हिंटेज प्रकारातील ब्रेसलेट वापरताना अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण ते नाजूक असल्याने तुटू शकतात. जिथे अधिक धावपळ करावी लागेल अशा ठिकाणी व्हिंटेज प्रकारातील बांगड्या वापरू नका. 

पारंपरिक आणि स्थानिक बँगल ब्रेसलेट : एखाद्या स्थानिक ठिकाणचे वैशिष्ट्य जपणारे, पारंपरिक आणि आदिवासी प्रकारचे बँगल ब्रेसलेट यांच्यावरील कलाकुसर थोडी क्लिष्ट असते पण साध्या पोशाखावरही हे ब्रेसलेट खुलून दिसते. साध्या शैलीतील पण उठावदार पॅटर्न असलेल्या पेहरावावर उत्तम पण फंकी लूक मिळू शकतो.