Sun, Dec 08, 2019 06:15होमपेज › Kasturi › थोडं वेगळं : फुटवेअर्स कोणती घ्याल?

थोडं वेगळं : फुटवेअर्स कोणती घ्याल?

Published On: Aug 01 2019 1:22AM | Last Updated: Aug 01 2019 1:22AM
विधिषा देशपांडे 

आपण घातलेला ड्रेस कितीही आकर्षक असला तर योग्य फुटवेअर्सअभावी आपला साज-शृंगार अर्धवट राहतो. त्यामुळे पायांचा, पंजाचा आकार लक्षात घेऊन फुटवेअर्सची निवड करायला हवी. अ‍ॅक्सेसरीजमध्ये फुटवेअर्सना महत्त्वाचं स्थान आहे. पण केवळ  फॅशनच्या मागे धावून त्यांची निवड करण्याऐवजी आपल्या पावलांचा, पायांचा आकार कसा आहे, हे लक्षात घेऊन शूज, सँडल किंवा अन्य फुटवेअर्सची निवड करू शकता. आपण घातलेला ड्रेस कितीही चांगला असला तरी योग्य फुटवेअर्सअभावी आपला साज-शृंगार अर्धवटच वाटतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी उंच टाचांच्याच सँडल्सची निवड केली पाहिजे. एका शोधानुसार सतत हाय हिल्स सँडल घातल्याने आपल्या चालण्याच्या पद्धतीतही कायमस्वरुपी बदल होऊ शकतो. यामुळे स्टाईलऐवजी आपल्या पंजाच्या आकाराकडे नेहमी लक्ष द्यावं. त्यामुळे आपण जे फुटवेअर्स वापराल ते तुमच्यासाठी स्टाईलिश तर ठरतीलच; पण त्याचबरोबर ते आरामदायकही ठरतील. 

आपली उंची जास्त असेल आणि आपल्याला छोटा ड्रेस किंवा डेनिम स्कर्ट वापरणं आवडत असेल तर आपण किचन हिल्स वापरू शकता. किचन हिल्सवाले फुटवेअर्स फ्लॅट असतात पण, त्यांचा सोल मजबूत आणि आरामदायक असतो. आपली उंची कमी असेल तर हिल्सवाले बूट आपल्या पर्सनॅलिटीला वेगळाच लूक देतील. आजकाल गुडघ्यापर्यंत लांब बूट वापरण्याचा ट्रेंड आहे. आपण स्लीम आहोत, असं दाखवायचं असेल तर अशा प्रकारचे बूट आपण वापरू शकता. याबरोबर आपण स्कीनी जीन्स किंवा गुडघ्यापर्यंतचा कोणताही ड्रेस अथवा स्कर्ट वापरू शकता. 

आपले पंजे अधिक रुंद असतील तर अशा चपलांची निवड करा, जे समोरुन रुंद असतील. त्यामध्ये आपला पाय दाबला जाणार नाही. ज्यामध्ये टाचांपाशी स्ट्राईप्स असेल अशा सँडल्सही आपण वापरू शकता. उंची चांगली असेल तर फ्लॅट सँडल्सचीच खरेदी करा. आपले पंजे छोटे असतील तर ज्यामध्ये आपल्या पायामध्ये पूर्णपणे फीट असतील असेच फुटवेअर्स निवडा. यासाठी फ्लॅट बॅली हा सर्वोत्तम पर्याय आहे. याशिवाय आपण छोट्या हिलवाल्या फुटवेअरचीही निवड करू शकता. जेव्हा अगदीच गरज असेल तेव्हाच पेन्सील हिलचा वापर करा. आपल्या पायांना ते वापरण्याची सवय असेल तर त्याचा अधिक वापर केल्यास पायांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. आपल्या ड्रेसशी मिळत्या जुळत्या रंगाच्या चपलांची खरेदी करण्याऐवजी काळ्या किंवा ब्राऊन रंगाच्या चपलांची निवड करा. कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर ते शोभून दिसतात. आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रत्येक प्रकारचे फुटवेअर्स असावेत. सँडल, चप्पल, बूट असे प्रत्येक प्रकारचे जोडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असावेत. पहिल्यांदाच चप्पल वापरल्यामुळे आपल्या पायाला वेदना होत असतील तर अंगठ्याजवळ कापूस ठेवू शकता. लाँग बूटस आज चलतीत आहेत. जीन्सवर अशा प्रकारचे बूट वापरू शकता. साडी घातली असेल तर हिल्सवाल्या सँडल वापरा. आपली उंची जास्त असेल तर छोट्या हिल्सची सँडल वापरू शकता. सँडल्समध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत. पण पर्पल आणि ब्राऊन कलर सध्या फॅशनमध्ये आहेत. त्याचप्रमाणे सिल्व्हर कलरलाही खूप पसंती दिली जात आहे.