होमपेज › Jalna › बीड-जालना प्रवेशासाठी जोगलादेवी बंधार्‍याचा वापर

बीड-जालना प्रवेशासाठी जोगलादेवी बंधार्‍याचा वापर

Last Updated: Mar 24 2020 12:47PM
तीर्थपुरी : पुढारी वृत्तसेवा 

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी बंधाऱ्याचा जिल्हाची सीमा पार करण्यासाठी  वापर करणाऱ्या वाहनधारकांना गावकऱ्यांनी प्रवेश नाकारला आहे. बीड व जालनामध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी नागरिक या मार्गाचा वापर करत आहे. गावकर्‍यांनी तात्‍पुरता हा मार्ग बंद केला आहे.  

याविषयी अधीक माहिती अशी की,  राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी जिल्हा बॉर्डर सील केल्‍या आहेत. असे असतानाही अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. याच पर्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातील नागरिक येऊ नये म्हणून जोगलादेवी बंधाऱ्यावरील रास्ता गावकऱ्यांनी दक्षता म्हणून बंद केला आहे. छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या  वाहनधारकांची प्रशासनाने दखल घेऊन कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे. 

 जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे वाहतूक करणारी वाहनधारक खुश्कीचा मार्ग शोधत आहेत. शहागड येथील मुख्य रस्ता बंद केल्यामुळे अलीकडेच असलेला जोगलादेवी बंधारा येथून जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा वाहनधारकांनी सुरू केला आहे. यामुळेच जोगलादेवी येथील नागरिकांनी दक्षता म्हणून  बंधाऱ्यावरचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांना विनंती केली आहे की,  हा रस्ता तुम्ही वापरू नका व त्यांनी बंधाऱ्यावर लाकडे व काट्या, बोराटे टाकून तात्पुरत्या स्वरूपामध्ये रस्ता बंद केला आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने दखल घेऊन हा रस्ता तात्काळ बंद करावा, अशी जोगलादेवी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.