Sat, Jul 11, 2020 13:16होमपेज › Jalna › खा.दानवे यांनी केली पाहणी

खा.दानवे यांनी केली पाहणी

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:24AM
टेंभुर्णी : प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून शेतकर्‍यांनी धीर सोडू नये असे आवाहन केले.

या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे,  उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, तहसीलदार जे.डी. वळवी,  तालुका कृषी अधिकारी अशोक गिरी, भाजपचे  तालुकाध्यक्ष गोविंदराव  पंडित, जिल्हा उपाध्यक्ष विजय परिहार , जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे ,प.स. सभापती साहेबराव कानडजे, उपसभापती प्रदीप मुळे, मधुकर गाढे, पं. स. सदस्य अश्रुबा बोर्डे, दादाराव सवडे, जगन जगताप आदींची उपस्थिती होती. 

मृतांच्या कुटुंबीयांना लाखांची मदत
गारपिटीने मृत्यू झलेल्या आसाराम जगताप यांच्या कुटुंबीयांची खासदार दानवे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महाराष्ट्र सरकारकडून चार लाख तसेच भाजपच्या वतीने एक लाख रुपयाची तातडीची मदत या वेळी त्यांनी मृतांच्या नातेवाइकास केली. गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून, लवकरात लवकर मदत मिळवून दिले जाईल असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.