होमपेज › Jalna › नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे पावसाचे प्रमाण

नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे पावसाचे प्रमाण

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:05AMभोकरदन : प्रतिनिधी

हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळते अथवा चुकतात. मात्र शेतकर्‍यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही. या शास्त्राला लिखित स्वरूप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी गावोगावी असतात. नक्षत्रावरून पाऊस जोडणारी ही कला जितकी उपयुक्त तितकीच मनोरंजक आहे.

कडक उन्हानंतर रोहिणी नक्षत्रात पावसाचे सर्वदूर आगमन झाले आहे.  सुरुवातीलाच सर्वदूर पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त करत आहेत. आकाशाला झाकोळून टाकणारे कृष्णमेघ वर्षाराणीच्या आगमनाची ग्वाही देत आहेत. यंदा उन्हाचा पारा 42 ते 43 अंशांपर्यंत गेला. त्यामुळे पाऊस चांगला पडेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. आता सर्वसामान्य नागरिकांपासून ते बळीराजापर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे ती मृग नक्षत्राच्या आगमनाची. ती वेळ आता जवळ आली असून 8 जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे.

 पंचाग तसेच अन्य जुन्या साधनानुसार पावसाचा अंदाज बांधला जात आहे. यात प्रत्येक नक्षत्राला वाहन देऊन त्याप्रमाणे किती पाऊस पडेल याचा अंदाजानुसार पावसाची लक्षणे सांगण्यात आली आहेत.