Sat, Jul 11, 2020 12:33होमपेज › Jalna › प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यावर धाड

प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यावर धाड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : (प्रतिनिधी) 

 जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या भोकरदन नाका परिसरातील वातानुकुलीत जुगार अड्डयावर धाड टाकून 20 प्रतिष्ठितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख एक लाख 20 हजार रूपयांसह आठ मोटारसायकली, 20 मोबाईल, विदेशी दारू, फर्निचर असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सकलेचानगर भागात असलेल्या प्री - प्रायमरी इंग्लिश स्कूल शाळेच्या आवारात गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांंना मिळाली होती. 

त्यानुसार सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी या शाळेच्या नावाआड चालणार्‍या जुगार अड्डयावर अनधिकृत विद्युत चोरी करून सहा एसी. बसवून  पत्त्याचे दोन क्लब सुरू होते. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक पोकळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे यांच्यासह सुमारे 50 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते. 

यावेळी जुगार खेळतांना 20 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी रोख एक लाख वीस हजार रूपये जप्त केले आहेत. तसेच आठ दुचाकी वाहने तीन लाख वीस हजार रूपयाचे , एक लाख रूपयाचे फर्निचर, वीस मोबाईल एक लाख रूपयाचे असा साडे सहालाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सर्व आरोपींना अटक करून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात एका वाहनातून नेण्यात आले. रात्रि उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. 

या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे , पोहेकॉ. कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, शेख रज्जाक, विनोद गडदे, गोकुलसिंग कायटे, सचिन चौधरी, सँम्युअल कांबळे, सदा राठोड, समाधान तेलंग्रे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी होते. जालन्यात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


  •