होमपेज › Jalna › अंबडमधून बेपत्ता झालेल्‍या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला 

अंबडमधून बेपत्ता झालेल्‍या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंबड : प्रतिनिधी

अंबड शहरातून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह भालगाव रोडवर आढळून आला आहे. अंबडच्या नूतन वसाहतमधील गोविंद शिवप्रसाद गगराणी (वय १९) हा काल दि. २७ रात्री घरातून बाहेर पडला होता. त्याचा नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात सदर विद्‍यार्थी बेपत्ता झाल्‍याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

आज सकाळी साडे आठ वाजण्‍याच्‍या सुमारास गोविंदचा मृतदेह भालगाव रोडवर आढळून आला. गोविंदच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्राचे घाव आढळले आहेत. अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह अंबड उपजिल्हा रूग्णालयात नेण्‍यात आला आहे.