Tue, Sep 17, 2019 03:39होमपेज › Jalna › वडीगोद्री परिसरात आठ महिन्यांत तीन खून

वडीगोद्री परिसरात आठ महिन्यांत तीन खून

Published On: Jan 31 2018 2:04AM | Last Updated: Jan 31 2018 12:30AMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्यांतर्गत आठ महिन्यांमध्ये तीन खुनाच्या घटना घडल्या. तसेच पाच वाहनचोरीचे  इतरही किरकोळ गुन्हे घडले. त्यानंतर कालच चालकाचे हातपाय बांधून हायवा ट्रक पळवला. या सगळ्या घटनांचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील  सौंदलगाव शिवारात वैष्णवी ढाब्याजवळ हायवा (क्रमांक एम एच 48 टी 6390) उभा केला असता चालकाचे हातपाय बांधून ट्रक चालकासह पळविण्यात आला होता. चालकाला एका उसाच्या फडात हात बांधून फेकून देण्यात आले होते. यापूर्वीही पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीसह जनावरे चोरी, खून व इतर गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex