Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Jalna › उसाच्या ट्रकखाली येऊन आरोग्यसेवकाचा मृत्यू

उसाच्या ट्रकखाली येऊन आरोग्यसेवकाचा मृत्यू

Published On: Jan 03 2019 12:35AM | Last Updated: Jan 03 2019 12:35AM
परतूर : प्रतिनिधी  

जालन्याहून परतूरकडे जाणार्‍या दुचाकीस्वार आरोग्यसेवकाचा उसाच्या ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.2) वाटूर रस्त्यावरील वैजोडा पाटीजवळ घडली. लक्ष्मण देशमुख असे मृताचे नाव आहे.

श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक लक्ष्मण देशमुख जालन्यावरून आपले काम आटोपून  दुचाकी (एम.21 एएम-0128) परतूरकडे येत असताना  परतूर वरून वाटूरच्या दिशेने ऊसाची वाहतूक करणारा ट्रकच्या  (एम 20 डब्लू 8462) मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच ते सात  फुटापर्यंत देशमुख यांचा मृतदेह ट्रकच्या चालाखाली फरफटत गेला.  देशमुख हे मंठा तालुक्यातील वायाळ पांगरीचे मुळचे रहिवासी असून नोकरीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून परतूर येथे वास्तव्यास होते. देशमुख यांच्या पश्‍चात आई , वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले आहे.