होमपेज › Jalna › खा. राजू शेट्टींच्या पुतळ्याचे दहन

खा. राजू शेट्टींच्या पुतळ्याचे दहन

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 2:00AMतीर्थपुरी : प्रतिनिधी

रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर येथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनाची नासधूस केलेच्या घटनेचा रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी येथील छत्रपती शिवाजी चौकात खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले.

यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष दीपक चिमणे, तालुकाध्यक्ष अशोक गाढेकर, सुभाष बोबडे, परमेश्‍वर गुजर, दीपक गुजर, उमेश गटकळ, शंकर ताटे, ज्ञानेश्वर जारे, रामेश्वर गटकळ, यांनी पो.हे.कॉ. डी.बी. हवाले यांना निवेदन देण्यात आले.