Thu, Jun 20, 2019 13:12होमपेज › Jalna › शाळांमध्ये लाख वृक्षांचा संकल्प

शाळांमध्ये लाख वृक्षांचा संकल्प

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:17AMजाफराबाद : प्रतिनिधी 

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कायम विना अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान दिल्याबददल राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण मंत्री यांच्या नावाने शाळांमध्ये सुमारे एक लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

मुप्टा मराठी शाळा संघटनेचा संकल्प असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन खैरे यांनी जाफराबाद येथे सोमवारी सांगितले. समर्थ माध्यमिक शाळेतून वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी गजानन खैरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजयसिंग गौतम होते. प्रा. डॉ. विजय पाटील, सुवर्णलंकार मंडळाचे अध्यक्ष गजानन उदावंत, सदानंद लोखंडे, डॉ. पी. जी. देशमुख, ज्ञानेश्‍वर चव्हाण, पी. एन. कानडजे, मुख्याध्यापक रामेश्‍वर सवडे, गजानन बुधवंत, माधवराव सोरमारे, मधुकर पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून संगोपनाचा संकल्प केला. याप्रसंगी देवेंद्र सुतार, प्रकाश निकम, मुकुंदा राऊत, मनीषा पडघन, शेख अहेमद, शुभम शुक्ला यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.