Wed, Feb 20, 2019 15:36होमपेज › Jalna › धोकादायक प्रवास!

धोकादायक प्रवास!

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 1:40AMकुंभार पिंपळगाव : प्रतिनीधी 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव  एसटी महामंडळाच्या बसेसची अपुरी संख्या व अनियमित आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून अवैध प्रवासी वाहनांवरील टपावर व जागा मिळेल तेथे प्रवास करावा लागतो. हा प्रकार बुधवारच्या आठवडी बाजारात पाहायला मिळाला.

कुंभार पिंपळगाव हे मोठे गाव असल्याने आठवडी बाजारा निमित्त भादली, शिवणगाव, उक्‍कडगाव, राजाटाकळी, नाथनगर, विनायक नगर येथून  नागरिक  बसची सुविधा नसल्याने  खाजगी वाहनाने  खरेदीसाठी येतात. या  गावातून दररोज शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कुंभार पिंपळगावात येतात. यामुळे  ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून खासगी प्रवाशी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.