Tue, Sep 17, 2019 03:42होमपेज › Jalna › काँग्रेसचा जाहीरनामा हा मुंगेरीलाल के हसीन सपने 

काँग्रेसचा जाहीरनामा हा मुंगेरीलाल के हसीन सपने 

Published On: Apr 03 2019 1:45AM | Last Updated: Apr 02 2019 11:49PM
जालना : प्रतिनिधी

काँग्रेसने दोनऐवजी एक एप्रिललाच जाहीरनामा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जुना जालन्यातील कल्याण घोगरे स्टेडियममध्येे  मंगळवारी आयोजित जाहीर  सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. विकास महात्मे यांच्यासह भाजप-सेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा ठरला होता. अर्जुन खोतकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने दावने यांची धावपळ झाली होती. या पार्श्‍वभूमीवर अर्ज भरण्याच्या दिवशी मुख्यमंत्री उपस्थित होते, हे विशेष. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी भाषणात काँग्रेसचा जाहीरमाना हाच मुद्दा मांडून जोरदार टीका केली. याशिवाय मराठवाड्यातील दुष्काळ व अन्य प्रश्‍नांवर सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

आम्ही  निवडून येणार असल्याने निवडणुकीची आम्हाला चिंता नाही. आम्हाला खरी चिंता आहे ती दुष्काळाची. सरकारने 4 लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान जमा केले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्तीच्या काळात 4 हजार 700 कोटी रुपयांची मदत केली. कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान आपल्या भागात दुष्काळी मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहचते किंवा नाही याकडे लक्ष द्यावे. मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत पिण्याचे पाणी, मराठवाडा ग्रीड, समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट, आयसीटी महाविद्यालयासह विविध योजना खासदार दानवेंच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या असेही त्यांनी सांगितले. गरिबी हटावची घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या काळातच खरी गरिबी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी शेकडो योजना आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह खासदार रावसाहेब दानवे, राज्यमंत्री खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालिका उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex