Sun, Apr 21, 2019 05:40होमपेज › Jalna › जालना : तोंडात फटाका फुटुन बालकाचा मृत्यू

जालना : तोंडात फटाका फुटुन बालकाचा मृत्यू

Published On: Oct 31 2018 10:57AM | Last Updated: Oct 31 2018 10:57AMजालना :  पुढारी ऑनलाईन 

दिवाळी येण्याअधिच प्रकाशमान करणाऱ्या सनावर काळोख पसरणारी घटना घडली असून तोंडात फटाका फुटुन बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे शोककळा पसरली आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील यश संजय गवते (वय- ७) ह्याचा मंगळवारी  दु १२ वाजण्याच्या दरम्यान तोंडात फटाका फुटुन अपघाती मृत्य झाला.  घराच्या अंगणात खेळत असतांना त्याने अचानक घरात येऊन आगपेटी नेली. त्यावेळी घरात त्याचे वडील जेवत होते. बाहेर जोरात फटाक्याचा आवाज झाल्यावर ते धावत बाहेर गेले. बाहेर येऊन पाहतात तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात दिसला. यावेळी त्याला उपचारासाठी उचलून बुलडाण्याला नेण्याचा प्रयत्न केला असता त्याची वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली होती.