Fri, Jun 05, 2020 02:39होमपेज › Jalna › अंजली दमानिया यांची परतूर कोर्टात हजेरी 

अंजली दमानिया यांची परतूर कोर्टात हजेरी 

Published On: May 09 2019 8:25PM | Last Updated: May 09 2019 8:24PM
परतूर : प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आज एका मानहानी प्रकरणात कोर्टात हजर झाल्या होत्या. बागेश्वरी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी त्यांच्यावर केलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. या प्रकरणी आज असलेल्या तारखेला श्रीमती दमानिया यांनी कोर्टासमोर सकाळी ११ वाजता हजार झाल्या.

यापूर्वी दमानिया यांच्या विरोधात भा. द. वि. नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी असलेली फौजदारी तक्रार परतूर न्यायालयात शिवाजीराव जाधव यांच्या वतीने वकील राहुल लक्ष्मीकांत लिंबूळकर यांच्यावतीने दाखल केलेली आहे. तर अंजली दमानिया यांच्या वतीने प्रतिवादी म्हणून वकील दीपक डहाळे हे काम पाहत आहेत. अंजली दमानिया या यापूर्वीही परतूर दिवाणी न्यायालयात हजार राहिल्या होत्या. यापूर्वी कोर्टामध्ये हजर राहण्यास संदर्भात समन्स पाठवलेले होते. अंजली दमानिया यांना पाहण्यासाठी न्यायालय परिसरात लोकांची चांगलीच गर्दी होती.