Sat, Jul 11, 2020 12:23होमपेज › Jalna › जालन्यातून सव्वा वर्षात 70 मुलांचे अपहरण

जालन्यातून सव्वा वर्षात 70 मुलांचे अपहरण

Published On: Apr 24 2018 1:39AM | Last Updated: Apr 24 2018 1:37AMजालना ः सुहास कुलकर्णी

जिल्ह्यातून गेल्या पंधरा महिन्यांत 70 मुला-मुलींच्या अपहरण करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी 61 अपहरणाचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

विविध कारणांमुळे घर सोडून गेलेली  मुले व मुली नातेवाईक व मित्र-मैत्रिणीकडे शोध घेऊनही न सापडल्यास पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. यावेळी पोलिस यंत्रणा अत्यंत संवेदनशिलतेने अशी प्रकरणे हाताळतात. घर सोडून गेलेल्या मुलांमधे आई-वडिलांवरील राग, शिक्षणाचा कंटाळा, एखादी चूक घडल्यास आई-वडील काय करतील या धाकाने पळून जाण्याचे प्रकार होतात. त्यातून काही घटनांमध्ये मुले पळून नेल्याच्या खोट्या कहानी रचतात. बर्‍याच घटनात पोलिस तपासात त्या उघड होतात, मात्र अनेकदा समज देऊन पोलिस मुलगा व पालकांना वाटी लावतात. 

मुलींमध्ये प्रेमप्रकरणातून घर सोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे. काही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून मुले फसवितात. त्यानंतर मुलगी फसल्याचे लक्षात आल्यानंतर काही दिवसांनंतर घरी परते. पालक बदनामीच्या भीतीने पेालिसांना नातेवाईकांकडे गेल्याचे खोटेच सांगून प्रकरणावर पडदा पाडतात. या सर्वांत मात्र पोलिसांची तपासासाठी पळापळ होते. जिल्ह्यात पोलिसांचे मुला-मुलींच्या अपहरणात तपासाचे प्रमाण चांगले आहे.

अनेक मुली गायब होऊनही त्यांचे पालक समाजातील प्रतिष्ठा अथवा मुलगी कोणाबरोबर गेली हे लक्षात आल्यानंतर पोेलिसांना सांगण्याचे टाळतात. काही प्रकरणांत गुन्हेगारी करणारे लोक भीक मागण्यासाठीही लहान मुले व मुलांचे अपहरण करीत असल्याचे दिसून येते. 

Tags : jalana, children, Kidnapping children