होमपेज › Jalna › ७/१२ वर साडेतीन कोटींचा बोजा 

७/१२ वर साडेतीन कोटींचा बोजा 

Published On: Aug 11 2018 1:38AM | Last Updated: Aug 11 2018 1:38AMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या शेतात अवैध  साठा  करणार्‍या जागा मालक व शेत- मालकांच्या सातबार्‍यावर  3 कोटी 58 लाख 11 हजार 200 रुपयांचा बोजा टाकण्याची कारवाई तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केली. याव्यतिरिक्‍त 8 जणांच्या जमिनीवर  लाखोचा बोजा टाकण्याची कारवाई सुरू असून त्यांना नोटीस दिल्यानंतर  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे ज्याच्या जागेत अवैध वाळूसाठा आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

याप्रकरणी तहसीलदारांनी आठ अवैध वाळूसाठा करणार्‍यांना दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटीस बजावल्या आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये बाजारभावाच्या पाच पट दंड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जमीन व महसूल कायदा अधिनियम 1966 नुसार ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. यामुळे अवैध वाळू विक्रीला चाप बसणार आहे.
तहसीलदारांनी शेतकर्‍यांना बजावल्या नोटीस

तालुक्यातील  पाथरवाला बु. येथील भागीरथीबाई विश्‍वनाथ भारती व वामन विश्‍वनाथ भारती मालकीच्या  गट क्र. 47 व 48 मध्ये 1178 ब्रास अवैध वाळू साठा करण्यात आला आहे. त्यांच्या जमिनीवर दंडात्मक कारवाई म्हणून 3 कोटी 58 लाख 11 हजार 200 बोजा टाकण्यात आला आहे. अवैध वाळूसाठा केलेल्या अन्य 8 जणांना केलेल्या दंडाच्या नोटीस देण्यात आल्या असून बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात  उत्तम सीताराम खोजे, रा. साडेगाव गट क्रमांक 1 मध्ये शेतात राहत्या घराजवळ 55 ब्रास दंड  12 लाख 72 हजार, लक्ष्मण कांता इंदलकर, रा. इंदलगाव गट क्रमांक 49 मध्ये 20 ब्रास, दंड 6 लाख 8 हजार, रवींद्र पद्माकर जहागीरदार, रा. हसनापूर गट क्रमांक 193 मध्ये 40 ब्रास दंड 12 लाख 16 हजार, भगवान नाथा खंडागळे, रा. हसनापूर गट क्रमांक 191 मध्ये 40 ब्रास, दंड  12 लाख 16 हजार, देवराव अण्णा शिंदे, रा. हसनापूर गट क्रमांक 191 मध्ये 15  ब्रास  दंड, 4 लाख 56 हजार, सचिन विलास परदेशी हसनापूर गट क्रमांक 191 मध्ये 35 मध्ये ब्रास,  दंड 10  लाख 64 हजार, किसन शाहू शिंदे, रा. हसनापूर गट क्रमांक 191 सोरजा बाई नामदेव सोनवणे, रा. मध्ये 25 ब्रास, दंड 7  लाख 60 हजार, सोरजाबाई नामदेव सोनवणे, रा. हसनापूर गट क्रमांक 191 मध्ये 15  ब्रास, दंड 5 लाख 47 हजार 200 दंड आकारण्यात आला आहे.