Sat, Jul 04, 2020 19:31होमपेज › Jalna › जालन्यात पोलिसी बनाव करून ४ लाखांची लुट!

जालन्यात पोलिसी बनाव करून ४ लाखांची लुट!

Last Updated: Nov 11 2019 1:32AM
वडीगोद्री : प्रतिनिधी

पोलिस म्हणून आले अन् ट्रक अडवून ४ लाख ६१ हजार रुपये लुटून नेल्याची घटना आज (ता.३०) औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथनगर येथे घडली. हैदराबादहून ४ व्यापारी शेळ्या खरेदी करण्यासाठी ४ लाख ६१ हजार रुपये रोख रक्कम घेऊन अजमेरला जात होते. त्यांचा ट्रक औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथनगर येथे तीन जणांनी थांबवला. त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगितले. गाडीतून गांजा विक्री करण्यास नेत असल्याची माहिती मिळाल्याने झडती घेणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी गाडीतली रोख रक्कम आपल्या ताब्यात घेऊन गाडी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याच्या सुचना करत रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून पसार झाले. याची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनेची दखल घेऊन महामार्गावरील सिसिस्टिव्ही फुटेज चेक केले मात्र अद्याप लुटनार करणारे मिळालेले नाहीत.