Wed, Feb 26, 2020 20:16होमपेज › Jalna › जालना : देवगाव फाटा- माळेगाव निकृष्ट रस्त्याच्या चौकशीची मागणी

जालना : देवगाव फाटा- माळेगाव निकृष्ट रस्त्याच्या चौकशीची मागणी

Last Updated: Feb 24 2020 1:26AM

देवगाव फाटा- माळेगाव निकृष्ट रस्ताबदनापूर (जालना) : प्रतिनिधी  

तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दूरवस्था असल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुद्धा सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातही प्रचंड घोळ दिसून येत आहे. देवगाव फाटा- माळेगाव येथे होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता नागरिक वर्तवित असून या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

बदनापूर तालुक्यातील देवगाव फाटा- माळेगाव यादरम्यान कुसळी मार्गे हा रस्ता आहे. या रस्त्याची अतिशय दूरवस्था झाल्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण आणि खडीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामात मात्र प्रचंड अनियमितता दिसून येत असून खडीकरण करण्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी ही माती मिश्रित आहे. या रस्त्यासाठी टाकण्यात येत असलेल्या खडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक मातीचे प्रमाण दिसत असून रस्त्याच्या बाजूला चारी करून त्यातून काढण्यात आलेला मातीवजा मुरुम या ठिकाणी रस्ता कामात वापरण्यात येत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र या कामाकडे दुर्लक्ष करत आहे.  याबाबत साशंकता निर्माण होत आहे. 

वाचा : पुणे : पबजी गेमने घेतला तरूणाचा बळी

या रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन तपासण्याची गरज असताना स्थानिक प्रशासकीय अधिकारी मात्र कानडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या  बांधकाम साहित्यानी हा रस्त्या बनवला तर एक-दिड वर्षातच हा रस्ता पूर्णता: पुन्हा खडडे्मय होण्याची शक्यता या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत या विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी नवीन असून यांची माहिती घेतो असे सांगत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या कामाकडे प्रशासनाने गंभीरतेने बघण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिक सांगितले आहे. देवगाव फाटा- माळेगावपर्यंत जवळपास सात- आठ गावांना जोडून हा रस्ता बदनापूर- औरंगाबाद तालुक्यांना जोडत आहे. तसेच या रस्त्यावर वाहतूक ही मोठया प्रमाणात होत असते. तसेच या परिस्थितीत हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविला गेल्यास त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नसल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे.

वाचा : वयाच्या ९७ व्‍या वर्षी निवडणूक जिंकून 'या' महिलेने केले रेकॉर्ड

देवगाव फाटा- माळेगाव रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असून संबंधित अधिकाऱ्याने वेळीच लक्ष देऊन रस्त्याचे काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अन्यथा प्रहार जनशक्तीकडून आंदोलन छेडण्यात येईल. 

-कल्याण गोरे, कार्याध्यक्ष प्रहार, जनशक्ती बदनापूर.