Thu, May 23, 2019 23:03होमपेज › International › शिक्षणासाठी तिने स्वतःशीच केले लग्न!

शिक्षणासाठी तिने स्वतःशीच केले लग्न!

Published On: Oct 11 2018 3:36PM | Last Updated: Oct 11 2018 3:36PMलंडन : पुढारी ऑनलाईन 

प्रत्येक तरूणीसमोर विवाह, शिक्षण आणि करियर या तीन गोष्टी नेहमी समस्या म्हणून समोर उभ्या असतात. भारतामध्ये मुली सेटल होण म्हणजे लग्न होऊन त्यांच्या घरी जाणे असे मानले जाते. मुलींनी विशी ओलांडली की आजुबाजूचे लोक विवाहसंदर्भात विचारू लागतात. त्यामुळे मुलींसमोर शिक्षण आणि करियरच्या या दोन्हीमध्ये विवाह हा मोठा प्रश्न पडत असतो. अशी परिस्थीती केवळ भारतातच नसून सातासमुदरापलीकडे देखील पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून एका तरूणीने स्वतः शीच लग्न केले. 

लंडनमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षाच्या एका तरूणीने आपले शिक्षण आणि चांगले करियर घडवण्यासाठी मित्र-परिवाराच्या साक्षीने स्वतःशीच लग्न केले. या तरूणीचे नाव जेमीमा असे आहे. 

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेमिमाला शिक्षणाच्या वाटेवर विवाह ही गोष्ट सतत भेडसावत होती. त्यावर उपाय म्हणून तिने विवाहाची सर्व तयारी केली.  मित्र आणि परिवाराला आमंत्रण केले. ख्रिश्चन धर्माच्या परंपरेनुसार तिने आपला विवाहसोहळा पार पाडला. त्यानंतर ती गाडीमध्ये बसून स्वतःची परतवणी देखील केली. सर्वांना तिच्या लग्नवरून प्रश्न पडत, असे त्याला उत्तर देण्यासाठी तिने स्वतःशीच लग्न केले. 

जेमिमाने सांगितले की, माझ्या या अशा निर्णय कुटूंब नाराज आहे. युगांड येथे राहणारा माझा मित्र-परिवार आणि आई-वडिल नेहमी मला लग्नासंदर्भात प्रश्न विचारत असतात. त्याच्या या प्रश्नापासून लांब जाण्यासाठी मी हा निर्णय घेतला. लग्नाचे काही फोटो माझ्या घरी पाठवले आहेत. पण ते खुश नाहीत, असे ती म्हणाली.