Fri, Jan 24, 2020 04:52
    ब्रेकिंग    होमपेज › International › अमेरिकेने भारताला अपाचे हेलिकॉप्टर विकण्यास दिली मंजुरी

अमेरिकेने भारताला अपाचे हेलिकॉप्टर विकण्यास दिली मंजुरी

Published On: Jun 13 2018 4:53PM | Last Updated: Jun 13 2018 4:46PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था 

अमेरिकेने भारताला ९३ कोटी डॉलरमध्ये ६ एएच ६४ इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने याची माहिती दिली. अपाचे हेलिकॉप्टरमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. 

अपाचे अटॅक हेलिकॉप्टरच्या समोरील भागात सेन्सॉर असल्‍यामुळे रात्रीही हेलिकॉप्टरचे उड्डाण करता येणे शक्‍य होणार आहे. पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती काँग्रेसला दिली आहे. खासदारांचा विरोध झाला नाही तर ही प्रक्रिया पुढे सरकण्याची आशा आहे, असे म्‍हटले जात आहे.

या हेलिकॉप्‍टरमध्‍ये आग नियंत्रण रडार ‘हेलफायर लाँग्बो मिसाइल’, स्टिंगर ब्लॉक I-92 एच मिसाईल, नाईट व्हिजन सेन्सर आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम्स विक्रीचाही समावेश आहे.