Mon, Jun 17, 2019 10:42होमपेज › International › हनीमून कपलने दारूच्या नशेत हॉटेलच विकत घेतले!

हनीमून कपलने दारूच्या नशेत हॉटेलच विकत घेतले!

Published On: Oct 12 2018 4:28PM | Last Updated: Oct 12 2018 4:28PMलंडन: पुढारी ऑनलाईन

प्रत्येक नवविवाहत जोडी विवाह सोहळ्यानंतर कोणत्या ना कोणत्यातरी प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जाते. अशीच एक नवविवाहीत जोडी श्रीलंकेत फिरायला गेली असता ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते तेच हॉटेल त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतले. ऐकून किंवा वाचून आचंबीत व्हाल. पण हो आंचंबीत होण्यासारखीच घटना आहे. 

२०१७मध्ये जीना ल्‍योंस आणि मार्क ली हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर हे दोघे हनीमूनसाठी तीन महिने श्रीलंकेला रवाना झाले. तेथे राहण्यासाठी दोघांनीही एक हॉटेल बुक केले होते. हॉटेलमध्ये जाताच त्यांनी मद्यपान केले. त्या दोघांनी १२ ग्लास रम पिल्यानंतर मद्यपानच्या नशेत चुर झाले.  त्याचदरम्यान हॉटेलच्या स्टाफने भाडेकरार संपणार असल्याचे सांगितले. हे विधान ऐकून दोघांनी  हॉटेलच विकत घेण्याचे ठरवले. 

जीना ल्‍योंसने सांगितले की, जेव्हा आम्ही मद्यपान करत होतो तेव्हा हॉटेलचे एक महिन्याचे भाडे १०,००० पाऊंड इतके असल्याचे सांगितले. त्यावेळी हे हॉटेलच विकत घेण्याचा विचार आमच्या दोघांच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी आमची भेट एका जेष्ठ दांपत्यशी झाली. हॉटेल नावावर करण्यासंदर्भात त्यांच्याशी ३०,०००पाऊंडचा करार केला आणि हॉटेल नावावर करून घेतले. ज्यावेळी हा करार करण्यात आला त्यावेळी हे दोघेही नशेत होते. करारानंतर दोघेही २०१८मध्ये मालक बनले. त्यांनी हॉटेलचे नाव बदलुन 'लकी बीच टैंगल' असे ठेवले.

मात्र,नंतर हे हॉटेल खरेदी करण्याचा जेनीला चांगलाच पश्चाताप झाला. जीना म्हणाली आम्ही हे नशेच्या भरात हॉटेल खरेदी केले होते. ज्यावेळी मी आई बनणार हे लक्षात आले तेव्हा नशेत हॉटेल खरीदे केले याचे वाईट वाटले. कारण त्यावेळी आम्ही दोघांनी ते हॉटेल नशेत खरेदी केले होते हे मुलांना कळल्यावर त्यांचे मत आमच्याबद्दल वाईट होईल. तुम्ही तुमचे पैसे वाया घालवले असे मत आमच्या एका मित्राने यापूर्वीच व्यक्त केले होते. आता हे हॉटेल चालवल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.